मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भांडवली बाजारात आलेल्या तेजीचे वातावरण अजूनही कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) 617 अंकांनी वधारताना दिसला. दिवसाअखेर सेन्सेक्स 51348 च्या पातळीवर राहिला. बाजारातील तेजीचा हा सलग सहावा दिवस आहे. यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.62 लाख कोटींची भर पडली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टीही 191अंकांनी वधारला. (Share market 8 February sensex gains 617 points)
सेन्सेक्स 30 या निर्देशंकातील 24 समभागांचे भाव आज वधारले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, भारती एअरटेल, पॉवरग्रीड आणि इन्फोसिसच्या समभागधारकांची चांगलीच चांदी झाली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, आयटीसी आणि बजाज ऑटोच्या समभागांची किंमत घसरली.
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्स एकूण 5050 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीने जवळपास 1400 अंकांची उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मूल्य 200.33 लाख कोटी होते. गेल्या सहा दिवसांमध्ये त्यामध्ये 2.62 लाख कोटींची भर पडली आहे.
अमेरिकेकडून प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याने आशियाई बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. याशिवाय, कोरोनाच्या लसीकरण मोहीमेने बऱ्यापैकी वेग पकडल्याने गुंतवणुकदारांचा आशावाद आणखी वाढला आहे. त्यामुळे गुंतवणुकदार बाजारपेठेत आणखी पैसे ओतत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अनेक गुंतवणूकदार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) अंतर्गत बचत करणं योग्य मानतात. पण यामध्ये नेमका कसा आणि काय फायदा होता जाणून घेऊयात. BOI AXA इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज योजनेंतर्गत गुंतवणूक आयकर कलम 80सी अंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची बचत करू शकता. म्हणजेच आताच्या करवाढीच्या 4 टक्के सेससोबत दरवर्षी 46,800 रुपये कर तुम्हाला भरावा लागणार आहे.
ELSS ही इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरी आहे. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर सवलत दिली जाते. 46,800 रुपयांची कर बचत गणना ही सगळ्यात जास्त कर स्लॅबवर अवलंबून आहे. उपकरांसह करावर 4 टक्के शिक्षण सेसेला जोडलं तर वर्षाकाठी 1.5 लाख रुपयांवर कर बचत 31.2 टक्के किंवा 46,800 रुपयांची सेव्हिंग होईल.
संबंधित बातम्या –
फक्त हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, कमी वेळात होईल डबल फायदा
गुंतवणूक एकच पण प्रत्येक महिन्याला मिळतील 19 हजार, आयुष्यभर होत राहिल कमाई
गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय ‘ही’ तरुणी
Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर 9,000 रुपयांनी स्वस्त झालं, वाचा आजचे ताजे भाव
(Share market 8 February sensex gains 617 points)