नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराच्या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदार गदगद झाले. बाजार उच्चांकावर उघडल्याने त्यांचा आनंद गगनात मावला नाही. दिवाळीपासून शेअर बाजाराने सोन्यावाणी परतावा दिला आहे. मध्यंतरी काही हादरे बसले, पण एकूणच या दीड महिन्यात शेअर बाजाराने नवनवीन रेकॉर्ड नावावर जमा केले. आज बुधवारी, शेअर बाजाराने धमाकेदार चाल दिसून आली. बाजाराने आज उंच झेप घेतली. निफ्टीने 21,500 अंकांचा टप्पा तर बीएसई निर्देशांकाने 71,600 अंकांचा टप्पा ओलांडला. तर बँक निफ्टी 48,000 अंकांच्या पुढाचा टप्पा गाठला. या तेजीच्या सत्राने आता गुंतणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
आज धमाकेदार ओपनिंग
आज, बुधवारी, 20 डिसेंबर 2023 रोजी रेकॉर्ड उच्चांकावर बाजार उघडला. बीएसईचा सेन्सेक्स 210.47 अंक वा 0.29 टक्क्यांची तेजीने उसळला. बीएसई 71,647 अंकावर उघडला. हा त्याचा नवीन विक्रम आहे. तर दुसरीकडे एनएसई निफ्टीने पण जलवा दाखवला. निफ्टी 90.40 अंक वा 0.42 टक्क्यांच्या शानदार तेजीसह 21,543 अंकाच्या स्तरावर पोहचला. निफ्टी हा उच्चांक गाठण्याचा बाजारातील तज्ज्ञांचा दावा खरा ठरला. काल बीएसई सेन्सेक्स 71,437 अंकांच्या स्तरावर बंद झाला तर एनएसई निफ्टी 21,453 अंकावर बंद झाला.
प्री-ओपन बाजार कसा
शेअर बाजाराचे प्री-ओपनिंग सत्रातच बाजार उघडताच कमाल करेल हे संकेत मिळाले होते. एनएसई निफ्टीत 89.75 अंकांची वा 0.42 टक्क्यांची तेजी दिसून आली. निफ्टी 21542 अंकावर पोहचला. तर बीएसई सेन्सेक्स 271.36 अंक वा 0.38 टक्क्यांच्या तेजीसह आगेकूच करत होते. या उच्चांकी उडीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. गुंतवणूकदारांना आता बाजारात रमण्याचे मोठे कारण हाती आले आहे.
2019-2021 या काळात बंपर उसळी
मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा मोठी उसळी घेतली. सेन्सेक्स 2019 मध्ये 5091 अंक, 2020 वर्षात 6401 अंक आणि 2021 मध्ये शेअर बाजार 10,468 अंकांची उसळी आली. दोन वर्षे कोरोनाने कहर केला. 2020 मध्ये निर्देशांकाने 47,896 अंकावर पोहचला. 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड तोडत निर्देशांक 62,245 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.
2022-2023 मध्ये निर्देशांकची घौडदौड
बीएसईने दिलेल्या आकड्यानुसार, सेन्सेक्स 2022 मध्ये 58,310 अंकावर उघडला आणि तो वर्षाच्या अखेरीस 60,840 अंकाच्या स्तरावर पोहचला. 2023 च्या सुरुवातीला निर्देशांक 60,871 अंकावर पोहचला. आता 15 डिसेंबर रोजी बीएसई निर्देशाक ऑल टाईम हाय 71,084 अंकावर पोहचला होता. निर्देशांकाने 10,212 अंकांची तेजी नोंदवली.