SKF ही कंपनी सर्वांनाच माहिती आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून अनेक कंपन्या शेअर बाजारात एक्स डिव्हिडेंट स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. या कंपन्यांच्या यादीत एसकेएफ इंडिया लिमिटेड ही कंपनी पण आहे. कंपनी एका शेअरवर 130 रुपयांचा लाभांश देत आहे. यापूर्वी पण कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. यावेळी सुद्धा कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे.
जुलै महिन्यात कधी रेकॉर्ड डेट
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 1 शेअरवर कंपनी गुंतवणूकदारांना 130 रुपयांचा लाभांश देईल. कंपनीने लाभांश देण्यासाठी 4 जुलै2024 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीत गुंतवणूक करायची आहे, त्यांना या तारखेपर्यंत गुंतवणूक करता येईल. त्यांना डिव्हिडंडचा लाभ मिळेल.
लाभांश देण्याचा मोठा इतिहास
कंपनीने यापूर्वी पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 28 जून 2023 रोजी एसकेएफ इंडियाने एक्स डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेंड केला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर 40 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. बीएसईवर उपलब्ध डेटा नुसार, 2021 आणि 2022 मध्ये कंपनीने 14.50 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश दिला होता. 2020 मध्ये कंपनीने 1 शेअरवर 130 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता.
शेअर बाजारात दमदार कामगिरी
शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 0.78 टक्क्यांनी उसळला. हा शेअर शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा 6791.05 रुपयांवर होता. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. एक वर्षांपासून हा शेअर होल्ड करुन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 38.90 टक्क्यांचा लाभ मिळू शकतो. कंपनीचा गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक 7349 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 4025 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 33,573.57 कोटी रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.