MARKET TRACKER: जगातील सर्वात महागडा शेअर, एका शेअरची किंमत तब्बल 40000000 रुपये!

| Updated on: Apr 20, 2022 | 8:36 PM

काही रुपयांपासून सुरू होणाऱ्या स्टॉक्सच्या किंमती कोट्यावधी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचतात. जगातील सर्वात महागडा शेअर (most expensive share) नेमका कोणता असा प्रश्न अनेकांना पडतो.

MARKET TRACKER: जगातील सर्वात महागडा शेअर, एका शेअरची किंमत तब्बल 40000000 रुपये!
मुंबई शेअर मार्केट
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक (SHARE MARKET INVESTMENT) करुन मोठ्या प्रमाणात परतावा मिळणं शक्य आहे. भारतात सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षात रिटेल गुंतवणुकदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. दरम्यान, छोट्या रकमेपासून गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला जातो. सर्वाधिक परतावा प्राप्त करण्यासाठी मोठ्या कंपनीत गुंतवणुकीचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक स्टॉक्सची किंमतीत फरक असतो. स्टॉक्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात आहेत. काही रुपयांपासून सुरू होणाऱ्या स्टॉक्सच्या किंमती कोट्यावधी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचतात. जगातील सर्वात महागडा शेअर (most expensive share) नेमका कोणता असा प्रश्न अनेकांना पडतो. कोणत्या कंपनीच्या शेअर्सची किंमत सर्वाधिक आहे. जगातील सर्वात महागडा स्टॉक बर्कशायर हाथवे इंक (Berkshire hathway inc) कंपनीचा आहे. एका शेअरची किंमत तब्बल चार कोटींहून अधिक आहे.

एक शेअर कोटीच्या घरात

आजच्या किंमतीत विचार केल्यास बर्कशायर हाथवे इंक कंपनीच्या एका शेअरची किंमत 523550 डॉलर (4 कोटी रुपये) आहे. प्रत्येक गुंतवणुकदाराचं स्वप्न कंपनीचा शेअर आपल्याकडं असावा असंचं असतं. मात्र, अनेकांसाठी बर्कशायर हाथवे इंकमध्ये गुंतवणूक करणे स्वप्नवतच ठरत. कंपनीचे सर्वसर्वो वॉरेन बफेट आहेत. जगातील सर्वात महागडा शेअर असलेल्या कंपनीचे मालक बफेट यांचा स्टॉक मार्केटमध्ये मोठा दबदबा आहे. जगभरातील गुंतवणुकदारांच्या नजरा बफेट यांच्याकडे असतात. फोर्ब्स मासिकाच्या वृत्तानुसार,बर्कशायर हाथवे मध्ये बफेट यांची तब्बल 16 टक्के भागीदारी आहे.

15 व्या वर्षी गुंतवणूक

वॉरन बफे (Warren Buffet) हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येतं. वॉरन बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व सर्वेसर्वा आहेत. कंपनीचे कार्यक्षेत्र अमेरिका असून कंपनीत एकूण 3,72,000 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीनं सध्या चीनमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. वॉरन बफेट यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : भारत माता की जय… आर्थर रोड कारागृहाबाहेर माध्यमांसमोर गुणरत्न सदावर्तेंची घोषणाबाजी!

Mumbai Police Guidelines : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यावर बंदी! सूत्रांची माहिती