Share Market New High : सेन्सेक्सची नवीन विक्रमाला गवसणी; निफ्टीने पण दिली सलामी, चार दिवसांपासून बाजारात तेजीचे सत्र

| Updated on: Jun 27, 2024 | 11:38 AM

Sensex, Nifty Record : गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु आहे. तर राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातच शेअर बाजारातूनही मोठी बातमी येऊन धडकली आहे. गुरुवारी शेअर बाजाराने नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. गेल्या चार दिवसांपासून बाजारात तेजीचे सत्र सुरु आहे.

Share Market New High : सेन्सेक्सची नवीन विक्रमाला गवसणी; निफ्टीने पण दिली सलामी, चार दिवसांपासून बाजारात तेजीचे सत्र
Piramal Enterprises चा शेअर 945 स्तरावर आहे. 1085 रुपयांचे टार्गेट आणि 900 रुपयांचे स्टॉपलॉस देण्यात आला आहे. या स्टॉक 52 Wk High 1140 रुपयांचा आहे. (सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.)
Follow us on

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी तुफान तेजी दिसून आली. शेअर बाजारात तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सातत्याने नवनवीन रेकॉर्ड नावावर नोंदवत आहे. गुरुवारी पण दोन्ही निर्देशांकांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली. मुंबई सेन्सेक्सने आता 79 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीने 24 हजारांचा नवीन रेकॉर्ड नावे केला आहे. व्यापारी सत्रात नवीन उच्चांकावर पोहचल्यानंतर दोन्ही निर्देशांक खाली घसरले. त्यानंतर ते सावरले. सेन्सेक्स 196.19 अंकांसह 78,876.54 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 38.25 अंकांसह 23,900 अंकावर होता.

सेन्सेक्सने तोडले सर्व रेकॉर्ड

बीएसई सेन्सेक्सने आज 78,771.64 हा नवीन विक्रम गाठला. काल बीएसई निर्देशांक 78,759.40 या स्तरावर पोहचला होता. तर मंगळवारी सेन्सेक्स 78 हजारांच्या घरात होता. म्हणजे अवघ्या 3 दिवसात सेन्सेक्सने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले आहेत. बाजार सकाळापासूनच एका मर्यादेत व्यापार करत होता. सेन्सेक्सचे 30 मधील 12 शेअर उसळीसह कारभार करत आहेत. तर 18 शेअरमध्ये घसरण आली आहे. अल्ट्राटेक सिमेंटने मोठी झेप घेतली आहे. कंपनी आज बाजारात टॉप गेनर ठरली.तर त्यानंतर जेएसडब्ल्यू स्टीलने मोठी दमदार कामगिरी केली.

हे सुद्धा वाचा

BSE चे बाजारातील भांडवल

बाजार उघडला तेव्हा बीएसईवरील सूचीबद्ध शेअरचे बाजारातील मूल्य 437.02 लाख कोटी रुपये होते. तर बाजार उघडल्याच्या अर्ध्या तासातच ते 438.46 लाख कोटींवर पोहचले. तर बाजार उघडल्यानंतर एका तासातच 10.12 वाजता मार्केट कॅप 439.07 लाख कोटी रुपये झाले. बीएसईवरील 3296 शेअरपैकी 2060 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर 1122 शेअरमध्ये घसरण दिसली. 114 शेअर कोणत्याही बदलाशिवाय व्यापार करत आहेत.

या शेअरला फायदा आणि नुकसान

अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने चार चाँद लावले. तर आशिया बाजारात दक्षिण कोरियातील कॉस्पी, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसँग आणि चीनच्या शंघाई कम्पोझिटमध्ये मोठे नुकसान झाले.

134 शेअर वर्षभराच्या उच्चांकावर

बीएसईवर आज 2692 शेअरमध्ये ट्रेडिंग सुरु आहे. त्यातील 1757 शेअर दमदार कामगिरी करत आहेत. तर 836 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. 99 शेअरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय 134 शेअर असे आहेत जे वर्षभराच्या उच्चांकावर आहेत. तर 12 शेअर हे वर्षभराच्या निच्चांकवर आहेत.