नवी दिल्ली | 23 February 2024 : चिप तयार करणारी कंपनी एनव्हिडिया (NVIDIA) सध्या चर्चेत आहे. कंपनीचा शेअर कमाल करत आहे. हा शेअर सूसाट सुटला आहे. त्याची बाजारातील गती पाहता, अमेरिकेतील दिग्गज वित्तसंस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) या शेअरला पृथ्वीवरील सर्वात महत्वपूर्ण स्टॉक म्हणून जाहीर केले आहे. Chip Manufacturer एनव्हिडियाने काही दिवसांपूर्वीच बाजारातील मोठी कंपनी गुगलला बाजारातील भांडवलाआधारे मागे टाकले आहे. कंपनीच्या शेअरने अमेरिकन शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण संचारले आहे. बाजाराने पण मरगळ झटकली आहे.
Amazon-Google ला टाकले मागे
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, AI Chip निर्माता कंपनीने गेल्या वर्षभरात जोरदार आगेकूच केली. तर यावर्षात, 2024 मध्ये नॅस्डॅक 100 इंडेक्सच्या आतापर्यंतची जोरदार घौडदौड केली आहे. या महिन्यात या कंपनीने अजून एक जोरदार कामगिरी बजावली. एनव्हिडियाने गेल्या आठवड्यात मंगळवारी मोठी झेप घेतली. कंपनीचे मार्केट कॅप सर्वाधिक वाढले. या कंपनीने गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक आणि दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ला पिछाडीवर टाकले. कंपनीचे बाजारातील भांडवल वाढून 1.78 ट्रिलियन डॉलरवर पोहचले. भारतीय चलनात ही रक्कम 14755016,30,00,000 कोटी रुपये इतकी होते.
टेस्ला पण पडली मागे
कंपनीचे शेअर्सने जोरदार कामगिरी बजावली. गेल्या एका वर्षात या कंपनीचा शेअर 225 टक्क्यांनी उसळला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये या वर्षात 650 अब्ज डॉलरची तेजी आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत कंपनी टेस्लाच्या एकूण भांडवलापेक्षा ही रक्कम अधिक आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मार्केट कॅप 586.06 अब्ज डॉलर इतके आहे. एलॉन मस्क हा टेस्लाचा मालक आहे.
अशी झाली होती सुरुवात
तैवानचे जेनसन हुआंग यांनी NVIDIA स्थापन केली होत. त्यांनी 1993 मध्ये ही कंपनी सुरुवात केली होती. सुरुवातीला ही कंपनी व्हिडिओ गेम ग्राफिक्स चिप्स तयार करण्याचे काम कंपनी करत होती. त्यानंतर चिप्सचा वापर वाढला. कंपनीने रॉकेट भरारी घेतली. कंपनीचे बाजारातील शेअर वाढला. कंपनीच्या संस्थापकाची संपत्ती वाढली.