आता इरादा पक्का, नाही बसणार अफवांचा शेअर बाजाराला फटका, Top-100 कंपन्यांचा मोठा फैसला

| Updated on: Jun 01, 2024 | 5:28 PM

Share Market Sebi Rules : लोकसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर बाजार प्रतिक्रिया नोंदवलेच. पण सोमवारी पण बाजारावर एक्झिट पोलचा परिणाम दिसेल. त्यामुळे सर्वांचे लक्ष 3 जून रोजी शेअर बाजाराकडे लागलेले असेल. पण सेबीच्या या नियमाची मोठी चर्चा सध्या रंगलेली आहे.

आता इरादा पक्का, नाही बसणार अफवांचा शेअर बाजाराला फटका, Top-100 कंपन्यांचा मोठा फैसला
आता इरादा पक्का, नाही बसणार गुंतवणूकदारांना धक्का
Follow us on

शेअर बाजारावर लोकसभा निवडणुकीचा परिणाम आतापर्यंत आपण पाहत आलो आहेत. बाजार तात्काळ प्रतिक्रिया देतोच. पण एक्झिट पोलबाबत पण बाजार प्रतिक्रिया देतो. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू परिस्थिती असेल तर बाजार नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवतो. पण स्थिर आणि मजबूत सरकारची चाहुल लागल्यावर बाजारात तेजी येते. गेल्या 20 वर्षांतील आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते. पण सध्या सेबीच्या एका नियमाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांचा परिणाम होऊ द्यायचा नाही, अशी तजवीज करण्याचा प्रयत्न होत आहे.

असा झाला बदल

मार्केट कॅपनुसार बाजारतील टॉप-100 सूचीबद्ध कंपन्यांनी 1 जूनपासून त्यांच्याविषयीच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी बाजार संबंधीत काही माहिती दिल्यास आणि ती अफवा असल्यास संबंधीत कंपनीला त्याचे खंडन अथवा पुष्टी द्यावी लागणार आहे. हा नियम 1 डिसेंबर 2024 पासून टॉप 250 कंपन्यांना लागू करण्यात येणार आहे. सध्या हा नियम टॉप-100 कंपन्यांना बंधनकारक आहे.

हे सुद्धा वाचा

24 तासात मांडावी लागेल बाजू

सेबीच्या नियमानुसार, या कंपन्या मुख्यधारेतील मीडियाने दिलेल्या कोणत्याही बातमीची पुष्टी अथवा खंडन करावे लागले. त्यावर 24 तासात स्पष्टीकरण द्यावे लागेल. एमएमजेसी अँड असोसिएट्सचे संस्थापक मकरंद एम जोशी यांच्या मते, यामुळे कॉर्पोरेट जगतातील अशी माहिती बाहेर येणार नाही, ज्यामुळे बाजार भांडवलावर त्याचा परिणाम होईल.

अफवांना बळ मिळू नये आणि ती अफवा असल्याचे स्पष्ट होण्यासाठी सेबीचे हे महत्वाचे पाऊल असल्याचे जोशी म्हणाले. त्यामुळे भारतीय बाजाराविषयी गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास दृढ होईल आणि निष्पक्ष बाजाराकडे वाटचाल होईल. निवडणूक काळात सुद्धा कंपन्यांविषयीच्या चुकीच्या माहितीला अटकाव होईल.

काय सांगतो अहवाल?

लोकसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर बाजार प्रतिक्रिया नोंदवेलच. पण त्यापूर्वी 3 जून रोजी सोमवारी शेअर बाजार एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देईल. त्यामुळेच सर्वांच्या नजरा या 3 जूनवर खिळल्या आहेत. एक्झिट पोल आल्यानंतर पहिल्यांदा त्यादिवशी शेअर बाजारात व्यवहार सुरु असेल. गेल्या 20 वर्षांतील आकडेवारी पाहता शेअर बाजार कशी प्रतिक्रिया देतो हे स्पष्ट होते. 3 जून रोजी शेअर बाजार कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. जर त्रिशंकू स्थिती असेल तर बाजारात पडझड दिसू शकते.

जर इंडिया आघाडी अथवा एनडीए यापैकी कोणाचे पण सरकार बहुमताने आले तर शेअर बाजारात तेजीचे सत्र येईल. शेअर बाजार भाजपच्या कामगिरीकडे पण लक्ष देईल. घटक पक्षांपेक्षा भाजपची कामगिरी किती दमदार राहिली हे पण बाजारावर परिणाम करु शकते. एनडीएमध्ये भाजपला फटका बसला. या पक्षाच्या कमी जागा आल्या तर बाजारा तात्काळ प्रतिक्रिया नोंदवेल. बाजारात घसरण येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.