नवी दिल्ली | 17 February 2024 : शेअर बाजारात या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना आनंदवार्ता दिली आहे. पेनी स्टॉक टापरिया टुल्सने (Taparia Tools) यापूर्वी गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे. यापूर्वी कंपनीने 4 बोनस शेअरचे गिफ्ट पण दिले आहे. आता कंपनी शेअरधारकांना एका शेअरवर 20 रुपयांचा लाभांश देणार आहे. त्यासाठी टापरिया कंपनीने रेकॉर्ड डेट पण जाहीर केली आहे. शेअरधारकांच्या दृष्टीने एक महत्वाची बाब म्हणजे ही रेकॉर्ड डेट फेब्रुवारी महिन्यात असेल. कंपनीने आतापर्यंत 4 बोनस शेअरचे वाटप केले आहे. चॉकलेटच्या किंमतीत येणाऱ्या या शेअरच्या कंपनीने दिग्गज कंपन्यांपेक्षा चांगला परतावा दिला आहे.
1 शेअरवर 200 टक्के लाभांश
12 फेब्रुवारी रोजी कंपनीने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, 10 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर 200 टक्क्यांचा अंतरिम लाभांश देण्यात येणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना एक शेअरवर ही कंपनी 20 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. या लाभांशसाठी रेकॉर्ड डेट 24 फेब्रुवारी 2024 ही निश्चित करण्यात आली आहे. ज्या शेअरधारकाकडे या दिवशी कंपनीचे शेअर असतील. त्यांनाच डिव्हिडंडचा लाभ देण्यात येईल.
यापूर्वी दिला बोनस शेअर
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.