Share Market Update : इराण-इस्त्रायल युद्धाचे भूत काही उतरेना; शेअर बाजार बेहाल, आता स्थिती काय?

| Updated on: Oct 04, 2024 | 9:54 AM

Share Market Friday : शेअर बाजारावरील इराण-इस्त्रायल युद्धाचे भूत काही उतरलेले नाही. आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात, शुक्रवारी शेअर बाजाराने भीत भीतच सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बाजार उघडताच तो घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टीची काय आहे स्थिती?

Share Market Update : इराण-इस्त्रायल युद्धाचे भूत काही उतरेना; शेअर बाजार बेहाल, आता स्थिती काय?
शेअर बाजारात कोसळधार
Follow us on

गुरूवारी शेअर बाजारात तांडव दिसून आला. इराण-इस्त्रायल युद्धाचे पडसाद उमटले. शेअर बाजार गडगडला. त्यामुळे आठवड्याच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजारात हाराकिरी निश्चित होती. आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात, शुक्रवारी शेअर बाजाराने भीत भीतच सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बाजार उघडताच तो घसरला. तरीही कालच्या तुलनेत बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांची सुरुवात चांगली दिसत आहे. आता काय आहे बाजाराची स्थिती?

ब्लॅक फ्रायडेची नांदी?

मध्य-पूर्वेतील युद्धाच्या झळा जगभरातील शेअर बाजारांना बसल्या आहेत. गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तर मोठा भूकंप आला. बाजारात हाहाकार उडाला. एका फटक्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींच्या वर पैसे बुडाले. त्यामुळे हा शुक्रवार ब्लॅक फ्रायडे ठरतो की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात अडखळत झाली. आज दिवसभरात काय घडामोडी घडतात ते समोर येईलच. आताच आलेल्या एका वृत्तानुसार हिजबुल्लाह संघटनेचा नवीन प्रमुख हाशिम सफिद्दीन सुद्धा मारल्या गेला आहे. त्यामुळे हे युद्ध अजून भडकण्याची आणि बराच काळ सुरू राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम आता सर्वच शेअर बाजारावर पडेल. पण भारताची आर्थिक आघाडीवरील घोडदौड पाहता युद्धाचे परिणाम किती दिवस भारतीय शेअर बाजाराला रोखू शकतील हा पण एक प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

आज सकाळी बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 252 अंकांनी घसरला आणि तो 82,244 अंकांवर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एनएसईचा निफ्टी 68 अंकांनी रेंगाळला. निफ्टी 25,181 अंकावर उघडला. आताचे ताजे अपडेट समाधानकारक आहेत. त्यानुसार, शेअर बाजार पुन्हा तेजीकडे वळण्याचे संकेत मिळत आहे. सध्या सेन्सेक्स सावरला आहे. तो 182.65 अंकांच्या घसरणीवर तर निफ्टी 47.05 अंकांच्या घसरणीवर आहेत.

या शेअरवर ठेवा लक्ष

बीएसई आणि एनएसईवर आज बॅकिंग क्षेत्रातील शेअर चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. तर टेक कंपन्यांचे शेअर पण कमाल दाखवू शकतात. इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, मारुती, टिसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल आणि इन्फोसिसच्या शेअरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.