नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : टाटा समूहातील या कंपनीच्या शेअरने कमाल केली आहे. कंपनीच्या शेअरने नवीन विक्रम केला आहे. शेअर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर आहे. या दरम्यान कंपनीचे मार्केट कॅप 3 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले आहे. या कंपनीत अनेक दिग्गज गुंतणूकदारांनी पैसा ओतला आहे. ते सर्व आज कोट्याधीश आहेत. या कंपनीचे बाजारातील भांडवल 3 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले आहे. या कंपनीत ज्या गुंतवणूकदारांनी एक लाख रुपये गुंतवले, त्यांना या शेअरने आज 7 कोटींचा परतावा दिला आहे. भारताचे वॉरेन बफे राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचा या कंपनीत मोठा वाटा आहे.
3401 रुपयांच्या घरात
टायटन ही टाटा समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा शेअर उच्चांकी स्तरावर पोहचला आहे. शेअर 3401 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 3 लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅपच्या दृष्टीने टीसीएसनंतर टायटनचा क्रमांक लागतो. टीसीएसने त्यांच्या शेअरहोल्डर्सला गोल्डन रिटर्न दिला आहे. 2000 मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य 7.20 कोटी रुपये असते.
ही तर सोन्याची कोंबडी
टायटन कंपनी 1984 मध्ये सुरु झाली आहे. कंपनीने ग्राहक आणि शेअरधारकांना मोठी लॉटरी लावली. या कंपनीने ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमावला. ही कंपनी सोन्याचं अंड देणारी कोबंडी ठरली आहे. 2011 मध्ये कंपनीने 1:1 प्रमाणात बोनस दिला होता. म्हणजे गुंतवणूकदारांना एका शेअरच्या बदल्यात एक शेअर मिळाला होता. आज टायटन देशातील सर्वात मोठी घड्याळ उत्पादन करणारी कंपनी आहे. तर जगातील 5 वी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे.
राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक
टायटनची सुरुवात 26 जुलाई 1984 रोजी झाली होती. कंपनी घड्याळ उत्पादन करते. सुरुवातीपासून कंपनीने या क्षेत्रात दबदबा निर्माण केला. 1995 मध्ये तनिष्कची सुरुवात झाली. 1997-98 या दरम्यान तनिष्कला मोठा फटका बसला. 1999 मध्ये तनिष्कने तोटा भरुन काढण्याची कवायत केली. 2002-2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. 2002 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी कंपनीचा शेअर खरेदी केला. त्यावेळी एका शेअरची किंमत 3 रुपये होता. आज कंपनीचा एक शेअर 2800 रुपयांच्या जवळपास आहे.