नवी दिल्ली : समाजाच्या (society), लोकांच्या कल्याणासाठी (People’s Welfare) अनेक उद्योगपती (Industrialist) दान देतात. पण ही रक्कम CSR फंडासारखी ठराविक असते. त्यापुढे काही ते सरकत नाही. तर काही प्रचंड दानशूर ही असतात. एवढा अफाट पैसा गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरता यावा यासाठी ते झटत असतात. ते एखादी ट्रस्ट (Trust) काढून त्यामार्फत समाजोपयोगी कामे करतात.
पण भारतातील या आधुनिक कर्णाने, दररोज तीन कोटी रुपयांचे दान करण्याचा विक्रम केला आहे. ही रक्कम एक दिवस, दोन दिवस नव्हे तर तब्बल 365 दिवस म्हणजे एक वर्ष त्यांनी रोज दान केली आहे.
आता ही दानशूर व्यक्ती कोण आहे, याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर या महान दानशूर व्यक्तीचे नाव आहे, शिव नडार. ते आयटी कंपनी एचसीएलचे संस्थापक आहे. एडलगिव हुरुन इंडिया फिलैथ्रॉपीच्या यादीनुसार, शिव नडार यांनी एका वर्षांत 1161 कोटी रुपयांचे दान केले आहे.
2022 एडलगिव हुरुन इंडिया फिलैथ्रॉपीने यादी तयार केली. त्यात शिव नाडार यांनी एका वर्षात 1161 कोटी रुपये दान केल्याचा दावा करण्यात आला. जर या संपत्तीला 365 दिवसांनी भागलं तर दररोज नडार यांनी प्रत्येक दिवशी 3 कोटी रुपये दान केल्याचे दिसून येते.
देशातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती होऊन नडार यांनी विप्रोचे अजीम प्रेमजी यांना मागे टाकले आहे. देशात आतापर्यंत अजीम प्रेमजी यांना सर्वात मोठे दानशूर मानण्यात येत होते.
परंतू ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, प्रेमजी हे यादीत दुसऱ्या स्थानी पोहचल्याचे सिद्ध झाले आहे. प्रेमजी यांनी ही दान करण्यात कंजुषी केलेली नाही. प्रेमजी यांनी एका वर्षात 484 कोटी रुपये दान केले आहे.
शिव नडार फाऊंडेशनची स्थापना 1994 साली करण्यात आली. त्यातंर्गत अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शाळा यांची सुरुवात करण्यात आली. शिक्षा क्षेत्रात नडार यांना मोठी आवड आहे. त्यादृष्टीने त्यांनी ही स्थापना केली आहे.