नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. राम मंदिर होत असल्याने देशातूनच नाही तर जगभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येणार आहेत. जगभरातील पर्यटकांसाठी पण अयोध्या हे हिलिंग डेस्टिनेशन ठरत आहे. अयोध्या जागतिक नकाशावर होतेच पण पर्यटक आवर्जून येथे भेट देत आहेत. त्यामुले हॉस्पिटॅलिटी उद्योगाला उभारी मिळाली आहे. स्थानिक हॉटेल्ससोबतच देशातील नामंवत ब्रँडला पण रामाची आठवण झाली आहे. या कंपन्यांनी अयोध्येत डेरा टाकण्याचे निश्चित केले आहे. ताज हॉटेलपासून ते ओबेरॉयपर्यंत अनेक बडे ब्रँड अयोध्येत हॉटेल उभारणार आहेत.
हॉटेल उद्योगाचे बुमिंग
अयोध्येत हॉटेल व्यवसायात गुंतवणूक वाढली आहे. काही रिपोर्टनुसार, दिग्गज हॉटेल कंपन्यांनी अयोध्येत त्यांच्या शाखा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. काहींनी जमीन खरेदी केली आहे. तर काहींचे हॉटेल उभारणीचे कामही सुरु झाले आहे. सध्या हॉटेल उभारणीसाठी अयोध्येत 50 मुख्य प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. तर फैजाबाद आणि अयोध्येत जवळपास 100 हून अधिक हॉटेल आहेत. एका अंदाजानुसार, अयोध्येत येत्या काही दिवसांत प्रत्येक दिवशी एक लाख भाविक दर्शनाला येतील.
बड्या ब्रँड्सची गुंतवणूक
अयोध्येतील हॉटेल्समधील रुमचे भाडे आताच एक लाख रुपयांच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हॉटेल उद्योगात बूम दिसून येईल. हॉटेल्ससह येथे गेस्ट हाऊसची संख्या वाढली आहे. धर्मशाळा आणि होम स्टेच्या संख्येत पण लक्षणिय वाढ झाली आहे. ताज हॉटेल, ओबेरायसह इतर अनेक बडे ब्रँड अयोध्येकडे वळले आहेत.
या कंपन्यांची हॉटेलसाठी गुंतवणूक
पर्यटकांची लागली रीघ
उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकड्यानुसार, वर्ष 2021 मध्ये अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या 3.25 लाख होती. 2022 मध्ये हा आकडा 85 पटीने वाढला. अयोध्येत 2.39 कोटी भाविक, पर्यटक आले. आता मंदिर तयार झाल्यावर त्यात 8-10 पट वृद्धी होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, अयोध्यात दरवर्षी 20-25 कोटी पर्यटक भेट देतील.