नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : श्रीमंत (Rich) होण्याची कोणाची इच्छा नाही. प्रत्येकाला वाटते, त्याच्याकडे धनदौलत असावी. सर्व संपत्ती पायाशी लोळण घ्यावी. सुखाने दरवाजा ठोठावावा. श्रीमंत होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी रोजची धावपळ सुरु आहे. अनेकांचा संघर्ष सुरु आहे. त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक पण करतात. अनेक जण आजही सोन्यावर फिदा आहेत. भारत तर सोन्यातील गुंतवणुकीत आघाडीवर आहे. चीनच्या खालोखाल भारतात सोन्याची आयात करण्यात येते. जितके जास्त सोने, तितका तो माणूस श्रीमंत मानण्यात येतो. अंगावरच नाही तर अंगभर दागिने घालून मिरवण्याची हौस, श्रीमंतीचं प्रदर्शनच असतं की नाही, पण ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांनी गुंतवणुकीचा गोल्डन मंत्र (Investment Golden Mantra) सांगितला आहे. त्यांच्या मते, सोने हे तुम्हाला झटपट श्रीमंत करणार नाही तर, हा धातू तुमचं चांगभलं करणार आहे.
डॉलर फेक, चांदी सेफ
तर रॉबर्ट टी. कियोसाकी यांच्या मते, गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये नव्हे तर चांदीत गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित आहे. सध्याच्या काळात हुशारी हीच आहे की, चांदीत गुंतवणूक करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी हा सल्ला दिला आहे. सोन्यापेक्षा चांदी सर्वाधिक मालामाल करेल, असा दावा त्यांनी केला आहे.
काय केले ट्विट
ग्रीनीज सोलर ईव्हीच्या मागणीत चांदी सर्वकालीन उच्चांकी स्तरापेक्षा 50 टक्क्यांनी घसरलेली आहे. कच्चा तेलानंतर चांदी सर्वाधिक उपयोगात येणारी वस्तू आहे. अनेक शतकांपासून चांदी केवळ मौल्यवान धातूच नाही तर अनेक ठिकाणी त्याचा उपयोग करण्यात येतो. चांदी हे एक धनच आहे. चांदीचा शिक्का खरेदी करणे, हे डॉलरमधील गुंतवणुकीपेक्षा कधीही चांगले, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
TIME FOR POOR TO GET RICH. Stocks, bonds, mutual funds, ETF & Real Estate crashing. As PREDICTED Middle class being wiped out. Silver moving sidewards. Silver to stay at $20 for 3-5 years, then climb to $100 to $500. Everyone can afford silver even poor. Accumulate silver now.
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) September 13, 2022
हा दिला गोल्डन मंत्र
कियोसाकी यांनी चांदीत गुंतवणुकीचा पहिल्यांदाच सल्ला दिला असे नाही. यापूर्वी पण त्यांनी सोन्यापेक्षा चांदीला प्राधान्य दिले आहे. त्यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला. त्यावेळी चांदीचा नक्कीच उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, भविष्यात सोन्यापेक्षा चांदी सर्वाधिक परतावा देईल. चांदीचा उपयोग उपकरणे, औषधं आणि इतर अनेक ठिकाणी करण्यात येतो. गरीबी सोडून श्रीमंत व्हायचे असेल तर सर्वात आधी चांदीत गुंतवणुकीला सुरुवात करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
ट्विट व्हायरल
रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, बँका, वित्तीय संस्था लवकरच माना टाकतील. अर्थात अमेरिकेतील परिस्थिती ग्राह्य धरुन त्यांनी हे ट्विट केले आहे. यामध्ये G, S, BC यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले. G म्हणजे सोने, S म्हणजे चांदी, तर BC म्हणजे बिटक्वाईन क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.