नवी दिल्ली : भारतीयाचं सुवर्णप्रेम (Gold) जगजाहीर आहे. चीननंतर भारत सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात करतो. पण एका अंदाजानुसार चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी (Silver) होणार आहे. येत्या दोन वर्षांत चांदीतून प्रचंड कमाई करता येणार आहे. कोरोनानंतर जगभरातील अर्थव्यवस्था (Economy) खुल्या होत आहे. उद्योगात चांदीची जबरदस्त मागणी वाढत आहे.
भारतासह जगभरात चांदीची मागणी वाढली आहे. 10 वर्षांत चांदीचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत चांदीचा भाव 1.25 लाख रुपये प्रति किलो होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कमोडिटी एक्सपर्ट अजय केडिया यांच्या दाव्यानुसार, भारतासह जगभरात यंदा चांदीच्या मागणीत जबरदस्त वाढ झाली आहे. उद्योगात चांदीचा वापर वाढल्याने यंदा चांदीच्या वापरात 16 टक्के वाढ झाली आहे.
वाढत्या मागणीमुळे जागतिक बाजारात चांदीचा एकूण वापर 1.21 अरब औसवर पोहचला आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटने एका अहवालात चांदीचे उत्पादन गेल्या दहा वर्षांत सर्वात कमी असल्याचा दावा केला आहे.
उत्पादनाच्या तुलनेत चांदीचा वापर वाढल्याने चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लंडनमध्ये सध्या 2016 नंतर चांदीचा साठा सर्वात नीच्चांकी स्तरावर पोहचला आहे. अहवालानुसार, चांदीचा अनेक उद्योगातील उपयोग वाढला आहे.
भारतासहीत जगभरातील देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर जोर देत आहेत. त्यासाठी सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत आहे. सौर ऊर्जावरील उत्पादनासाठी चांदीची मोठी आवश्यकता आहे.
वाहनातील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईससाठी ऑटोमेकर कंपन्या चांदीचा मोठा वापर करत आहेत. सोलर पॅनलसाठी एकूण चांदीचा वापर 10 टक्के तर वाहन क्षेत्रात 5 टक्के उपयोग होत आहे.