नवी दिल्ली : नायका (Nykaa) ची मूळ कंपनी ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचा शेअर गुरुवारच्या शेअर बाजाराच्या (Share Market) सत्रात चांगलाच वधरला. या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक (Highest Level) म्हणजे 162.50 रुपये गाठला. एकीकडे गुंतवणूकदारांसाठी बोनसची (Bonus) घोषणा केल्याने या शेअरवर गुंतवणूकदारांच्या गेल्या काही दिवसांपासून उड्या पडत असताना आता परदेशी गुंतवणूकदारही त्यात मागे नसल्याचे दिसून आले आहे.
या शेअरच्या कामगिरीमुळे विदेशी गुंतवणूकदारही (Foreign Investors) या शेअरकडे आकर्षीत झाले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. मॉर्गन स्टेनली या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराने या फॅशन ब्रँडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
वृत्तानुसार, मॉर्गन स्टेनलीने नायका मध्ये बल्क शेअर खरेदी केली आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीने नायकाचे अनेक शेअर खरेदी केले. सिंगापूरच्या या एफआयआयने 186.40 प्रति शेअर या भावाने नायकाचे 82,13,050 शेअर खरेदी केले.
यामुळे परदेशी फर्मही नायकाच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. ही डील बघता इतर ही एफआयआय या फॅशन ब्रँडमध्ये गुंतवणूक करतील असे दिसते. सिंगापूरच्या या फर्मने नायकामध्ये एकूण 153 कोटींची गुंतवणूक केली आहे.
नॉर्वेच्या नोर्गेस बँकेनेही नायकाचे शेअर खरेदी केले. 173.35 रुपये प्रति शेअरने 39,81,350 रुपये खरेदी केले. या बँकेने एकूण 69 कोटींचे शेअर खरेदी केले आहे. तर एफआईआई एबरडीन स्टँडर्ड एशिया फोकस पीएलसीने 42,72,334 शेअर्सची खरेदी केली आहे. त्यापोटी 74 कोटींची गुंतवणूक केली आहे.
गेल्या दोन दिवसातच परदेशी पाहुण्यांनी या शेअरमध्ये तुफान खरेदी सत्र आरंभलं आहे. तीन परदेशी संस्थांनी जवळपास 290 कोटींचे शेअर खरेदी केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नायका हे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा राहील, हे नक्की.