नवी दिल्ली : तुम्हाला पुढील पाच वर्षांत घर खरेदी (Home) करायचे आहे का? तर मग त्यासाठी आतापासूनच तयार करा. ड्रीम होमसाठी तुम्हाला मोठ्या निधीची गरज भासेल. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला डाऊन पेमेंटची रक्कम उभारता येईल. प्रत्येक महिन्यात म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणूक (SIP) केल्यास त्याचा चमत्कार दिसून येईल. सिस्टमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅनमधील (Systematic Investment Plan) गुंतवणूक पाच वर्षानंतर तुमच्या मदतीला येईल. फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडियाने कॅलक्युलेटरच्या माध्यमातून पाच वर्षानंतर 10 लाख रुपयांचे लक्ष्य कसे गाठता येईल, त्यासाठी दरमहा किती एसआयपी निश्चित करावा याची माहिती दिली.
तज्ज्ञांच्या मते, एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. या आधारे गणित मांडले, आकडेमोड केली तर पुढील पाच वर्षांत डाऊनपेमेंटचे 10 लाख रुपये तुमच्या हातात राहतील. पण त्यासाठी अर्थात मोठी बचत करावी लागेल. मग दरमहा किती रक्कम जमा केली तर ही भलीमोठी रक्कम मिळले हे पाहुयात.
तर पाच वर्षांनी दहा लाख रुपये हवे असतील तर आतापासून दरमहा 12,244 रुपयांचा एसआयपी सुरु करावा लागेल. या एसआयपीत कधीही खंड पडता कामा नये. गुंतवणूक करताना आर्थिक शिस्त पाळावी लागेल. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात रक्कम जमा केल्यास पाच वर्षानंतर तुमच्याकडे डाऊन पेमेंटची भली मोठी रक्कम, 10 लाख रुपये जमा असतील.
कॅलक्युलेटरनुसार, जर तुम्ही दरमहा 12,244 रुपये एसआयपीत टाकले तर पाच वर्षानंतर गुंतवलेली एकूण रक्कम 7,34,640 रुपये होईल. तर तुम्हाला परताव्यात एकूण 10,09,963 रुपये मिळतील. म्हणजे 2,75,323 रुपये व्याज मिळेल. हा परतावा दरमहा गुंतवलेली रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिटर्न मिळण्याचा अंदाज यावर आधारित असतो.
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे सोपे असले तरी हा जोखिमयुक्त सौदा आहे. शेअर बाजारातील चढउताराचा त्यावर परिणाम दिसून येतो. पण एक फायदा असतो. या रक्कमेवर तुम्हााल कमाऊंडिंग रिटर्नचा फायदा मिळतो. तुमची मूळ गुंतवणूक आणि त्यावरील रिटर्न याआधारे एकूण रक्कम मिळते.
जर तुम्ही आर्थिक गरजा भागविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (SIP) अत्यंत फायदेशीर ठरते. दरमहा योग्य गुंतवणूक केल्यास, त्यात खंड न पडू देता गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल. त्यातून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील. तुमची स्वप्न पूर्ण होतील.