Petrol Diesel Price Today : आज राज्यात ठाणे, पुणेकरांना इंधनासाठी जास्त दाम मोजावे लागणार नाहीत. तर इतर शहरात मात्र पुण्यापेक्षा प्रति लिटर दोन ते अडीच रुपये जास्त मोजावे लागतील.
Ad
कुठे स्वस्त, कुठे महाग
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलामध्ये चढउताराचे सत्र सुरु आहे. पण डॉलरच्या किंमतींवर होणाऱ्या परिणामांमुळे त्यामध्ये मोठी उसळी आली नाही. अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह, व्याजदर वाढीचे संकेत मिळत असल्याने कच्चे तेल, सोने-चांदी दबावाखाली आहे. या महिन्यापासून ओपेक प्लस देशांनी तेल उत्पादन घटविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करतील. चीनने झिरो कोविड धोरण गुंडाळल्याने तिथे इंधनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमतींचा भडका उडण्याची शक्यता आहे. आज राज्यात ठाणे, पुणेकरांना इंधनासाठी(Petrol Diesel Price) जास्त दाम मोजावे लागणार नाहीत. तर इतर शहरात मात्र पुण्यापेक्षा प्रति लिटर दोन ते अडीच रुपये जास्त मोजावे लागतील.
कच्चा तेलाची उसळी
आज 30 एप्रिल रोजी कच्चा तेलाने उसळी घेतली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आज 76.78 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) वधारुन 80.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.
रशियानंतर इराक धावला
रशिया पाठोपाठ आता इराक भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.