नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या आघाडीवर नरमाई आहे. कच्चे तेल सातत्याने घसरणीवर आहे. गेल्या आठवड्यात एक वेळा किंमतीत किंचित वाढ झाली होती. त्यानंतर घसरण सुरु आहे. गेल्या पाच महिन्यात किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहेत. पण देशात गेल्या 13 महिन्यांत जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही. गेल्या वर्षभरात भाव न वाढवल्याचे कारण पुढे करत नागरिकांचा खिसा कापण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Rate Today) कमी झाल्या नाहीत.आज एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी तुमच्या खिशाला इतकी झळ बसेल. तुमच्या शहरातील इंधनाचे दर एका एसएमएसवर जाणून घ्या..
कच्चा तेलात घसरण
आज कच्चा तेलातील घसरण कायम आहे. 11 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.79 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 70.17 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत.
इंधन होईल स्वस्त
सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.
जून महिन्यात पहिली कपात
मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक झाल्या. आता 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पहिली कपात होण्याची शक्यता आहे.
भाव एका SMS वर