कोरोना काळात तुमची नोकरी गेलीय आणि हताश न होता तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर अभिनेता सोनू सूद तुम्हाला मदतीचा हात पुढे करणार आहे.
अभिनेता सोनू सूदने स्वतःची संपत्ती गहाण ठेवून, त्यावर तब्बल 10 कोटींचे कर्ज घेतले आहे. या पैशांतून त्याने कोरोना काळात नोकरी गमवलेल्या लोकांना ‘ई-रिक्षा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदत कार्याला त्यांनी ‘खुद कमाओ, घर चलाओ’, असे नाव दिले आहे.
या योजने अंतर्गत सोनू सूद नोकरी गमावलेल्या गरजू व्यक्तींना ई-रिक्षाचे वाटप करणार आहे. गरजूंना आत्मनिर्भर करण्यासाठी एक पाऊल पुढे, अशा आशयाचे ट्विट करत सोनू सूदने या योजनेचे लोकार्पण केले आहे.
जर, तुम्हीही या काळात नोकरी गमवली आहे आणि तुम्हाला मदतीची गरज आहे. तर, सदर योजनेअंतर्गत SonuSood.ShyamSteelIndia@gmail.com या मेल आयडीवर मेल करून मदतीची मागणी करू शकता
या आधीही सोनू सूदने अशा अनेक प्रकारच्या योजना राबवत विद्यार्थी, रुग्ण आणि गरजू लोकांना मदतीचा हात पुढे केला होता.