मुंबई : विकेंड जवळ आलाय, अशातच जर आपण कुठेतरी बाहेरगावी जाण्याची योजना आखत असाल तर हा विमान प्रवास आपल्यासाठी स्वस्त ठरणार आहे. वास्तविक, स्पाइसजेट ही विमान कंपनी सध्या फ्लाईट तिकीट बुकिंगवर मोठी सवलत देत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पाइसजेट कंपनी ‘बुक बेफिकर सेल’ चालवत होती, ज्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे. आता आणखी काही दिवस प्रवासी त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत. एवढेच नव्हे, तर स्वस्त तिकिटाव्यतिरिक्त तिकीट कॅन्सलेशन फी आणि व्हाऊचरवरदेखील पुढील उड्डाणांसाठी कंपनीकडून सूट दिली जात आहे (SpiceJet offering domestic flight ticket only in 899).
स्पाइसजेटची ही ऑफर गेल्या’ काही दिवसांपासून सुरू आहे, जी आता 29 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर आपणही कुठेतरी जाण्याचे ठरवत असाल, तर आजच आपण या ऑफरद्वारे तिकिटे बुक करू शकता आणि ट्रेनपेक्षा कमी रकमेत हे तिकिट तुम्हाला मिळेल. चला तर, जाणून घेऊया या ऑफरमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ऑफरसाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत…
स्पाइसजेटने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आपण केवळ 899 रुपयात उड्डाणांचे तिकीट बुक करू शकता. तिकिट प्रवास दिवसाच्या 21 दिवस आधी तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय ते रद्द देखील करू शकता आणि प्रवासाची दिशा बदलू शकता. या ऑफर अंतर्गत तिकिट बुकिंग केल्यावर तुम्हाला भविष्यातील तिकिट बुकिंगसाठी 1000 रुपयांचे कूपन देखील देण्यात येईल. तसेच तुम्हाला जेवण, स्पाइसमेक्स, सीट बुकिंगवर भरघोस सूट दिली जाणार आहे.
या ऑफरमध्ये आपण 29 जानेवारीपर्यंत म्हणजेच केवळ आजच तिकिट बुक करू शकता. तसेच, या तिकिटावर आपल्याला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रवास करावाच लागेल(SpiceJet offering domestic flight ticket only in 899).
या तिकिटावर केवळ एकच ऑफरचा लाभ घेता येणे शक्य आहे. या ऑफरसह इतर ऑफर जोडल्या जाऊ शकत नाहीत. तसेच ही ऑफर ग्रुप बुकिंगसाठीदेखील उपलब्ध नाही. या ऑफरचा फायदा लोकांना पहिल्यांदा आणि पहिल्या सेवा दिलेल्या आधारावर दिला जाईल. फ्लाईट वेळापत्रक बदलले देखील जाऊ शकते, जे आपल्याला आधीच सूचित केले जाईल. याद्वारे आपण केवळ डोमेस्टिक ठिकाणाचे अर्थात केवळ भारतातील ठिकाणाचे तिकिट बुक करू शकता.
या सेलमध्ये तिकीट बुक केलेल्या प्रत्येक प्रवाशाला प्रवासाच्या आधारे मोफत व्हाऊचर दिले जाईल. हे केवळ त्या व्यक्तीसच वैध असेल, ज्याने पूर्वी प्रवास केला असेल. हे व्हाऊचर आपल्याला तिकिटिंगच्या 48 ते 72 तासांच्या आत ईमेलद्वारे पाठवले जाईल. जर कोणी हे तिकीट रद्द केले, तर हे व्हाऊचर देखील स्वतःच अवैध होईल.
(SpiceJet offering domestic flight ticket only in 899)
Travel | ‘बंजी जंपिंग’ करायचीय? मग ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!#BungeeJumping | #adventuresports | #travel https://t.co/hSLUehJ72G
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021