नवी दिल्ली : या दिवाळीत (Diwali) तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक भेट (Financial Gift) देऊ शकता. जगभरातील अर्थव्यवस्था (Economy) मंदीच्या (Recession) दिशेने धावत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात कुटुंबातील व्यक्तींसाठी आर्थिक तरतूद करणे फायद्याचे ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला दरमहा एका छोट्या रक्कमेची बचत करावी लागणार आहे.
जर तुम्ही दरमहिन्याला 5000 रुपयांची SIP सुरु करणार असाल तर काही महिन्यांतच तुम्हाला बंपर रिटर्न मिळतील. या पैशांतून पुढील काही वर्षांत तुम्ही महागडे आभूषण वा दागिने खरेदी करु शकता. जर अजून काही वर्षे गुंतवणूक सुरु ठेवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
आनंद राठी वेल्थ लिमिटेड चे डिप्टी CEO फिरोज अजीज यांनी SIP चा फायदा समजावून सांगितला होता. त्यांनी स्मॉल कॅप फंडमधील गुंतवणुकीची माहिती दिली होती. त्यानुसार, स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक जोखीमीची असते, तेवढीच फायद्याची असते.
जर तुम्ही स्मॉल कॅप फंडात दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन केले तर रिस्क फॅक्टर कमी होतो. जोखीमेचा सौदा फायदेशीर ठरतो. त्यातील जोखीम कमी होते आणि ही गुंतवणूक फायद्याची ठरते. त्यामुळे अनेकदा दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो.
अजीज यांनी स्मॉल कॅप फंड ABSL Small cap Fund मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या फंडने एका वर्षात 9.6 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तीन वर्षांत 25.9 टक्के तर पाच वर्षांत 6.2 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
ABSL Small cap Fund मध्ये NAV यावेळी 52.13 रुपये आहे. यामध्ये सध्याच्या घडीला कमीत कमी 1000 रुपयांची एसआयपी करता येऊ शकते. या फंडचा आकार जवळपास 3000 कोटी रुपये आहे.
जर तुम्ही या दिवाळीला तुमच्या पत्नीच्या नावे 2000 रुपयांची SIP सुरु केल्यास तीन वर्षांत तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. एसआयपीच्या कॅलक्युलेटरनुसार, तीन वर्षानंतर तुम्हाला एक लाख रुपये मिळतील.
ABSL Small cap Fund मध्ये 2000 रुपयांची SIP सुरु केल्यास तुम्ही 72 हजार रुपये जमा कराल आणि त्यावर तीन वर्षांत व्याज गृहीत धरुन ही रक्कम एक लाख रुपये होईल. ही रक्कम पूर्णतः करमुक्त असेल. एवढ्या रक्कमेत तुम्ही पत्नीसाठी तीन वर्षाच्या परताव्यावर एखादे आभूषण वा दागिना खरेदी करु शकता.