नवी दिल्ली: रिटेल गुंतवणुकदारांमध्ये (Retail Investor) एलआयसी आयपीओचं मोठ आकर्षण दिसून येत आहे. रिटेल क्षेत्रासाठी राखीव 6.9 कोटी शेअर्सची बोली लावण्यात आली आहे. एलआयसी आयपीओत कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल डिस्काउंट ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना आयपीओसाठी बोली लावण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेने विशेष कर्ज योजना (Special Loan) सुरू केली आहे. स्टेट बँक कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज किंवा एकूण खरेदी मूल्याच्या 90 टक्के यापैकी कमी असणारी बाब मंजूर केली जाणार आहे. स्टेट बँकेने विशेष कर्जासाठी व्याजदर 7.35 टक्के निश्चित केला आहे. एलआयसीत कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या 114498 इतकी आहे. यासोबतच बँकेने प्रक्रिया शुल्क देखील सूट दिली आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी आयपीओमधील (Policyholder IPO) 15.8 लाख शेअर राखीव ठेवण्यात आले आहेत.
एलआयसी आयपीओसाठी प्रति शेअर 902-949 रुपयांचा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. मात्र, तुम्ही एलआयसी पॉलिसीधारक, कर्मचारी किंवा रिटेल गुंतवणुकदार असल्यास तुम्हाला 60 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. एलआयसीने पॉलिसी धारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये, रिटेल गुंतवणुकदार तसेच कर्मचाऱ्यांसाठी 45-45 रुपये शेअर डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही एलआयसीचे कर्मचारी असाल आणि तुमच्याकडे पॉलिसी असेल आणि रिटेल गुंतवणुकदारही असल्यास तुम्ही तिन्ही प्रकारच्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. एलआयसीचे चेअरमन एम.आर. कुमार यांनी एलआयसी आयपीओच्या माध्यमातून डिस्काउंट प्राप्त करु इच्छिणाऱ्या अर्जदाराला तीन स्वतंत्र श्रेणीत अर्ज करावे लागतील.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओला तिसऱ्या दिवशी देखील बंपर प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ तिसऱ्या दिवशी 1.23 पट सबस्क्राईब झाला आहे. सार्वजनिक होण्याच्या दुसऱ्याच दिवशी आयपीओला 100% सबस्क्रिप्शन मिळाले होते. आतापर्यंत 16.2 कोटी शेअर्सच्या ऑफर साईझच्या तुलनेच 19.87 कोटी शेअरला बोली मिळाली आहे. पॉलिसीधारकांसाठी (Policyholder Quota) राखीव कोट्यातून 3.64 पट, कर्मचाऱ्यांच्या कोट्यातून 2.76 पट आणि रिटेल गुंतवणुकदारांच्या कोट्यातून 1.11 पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे.
· पॉलिसी धारकांना 60 रुपये आणि रिटेल आणि कर्मचाऱ्यांना 45 रुपयांचा डिस्काउंट
· आयपीओचा लॉट साईझ 15 शेअर्सचा
· एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राईस ब्रँड निश्चित
· आयपीओच्या माध्यमातून सरकार एलआयसीतील 3.5 टक्के भागीदारी विकणार
· आयपीओच्या माध्यमातून 22 कोटींहून अधिक शेअर्सची विक्रीचं लक्ष्य
· अँकर गुंतवणुकदारांसाठी 5.9 कोटी, कर्मचाऱ्यांसाठी 15.8 लाख, पॉलिसीधारकांसाठी 2.2 कोटी शेअर