Digital transaction : वाचाल तर ‘वाचवाल’, डिजिटल फ्रॉड टाळण्यासाठी SBIचा अलर्ट, ग्राहकांसाठी मार्गदर्शिका जारी

| Updated on: Apr 25, 2022 | 7:41 PM

डिजिटल अर्थव्यवहार (DIGITAL TRANSACTION) करणाऱ्या ग्राहकांना नेमकं काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वंकष माहिती प्राप्त होईल. लॉग-इन सुरक्षा, इंटरनेट सुरक्षा, यूपीआय सुरक्षा आणि डेबिट व क्रेडिट कार्ड सुरक्षा आदी विषयी माहिती मार्गदर्शिकेत समाविष्ट आहे

Digital transaction : वाचाल तर ‘वाचवाल’, डिजिटल फ्रॉड टाळण्यासाठी SBIचा अलर्ट, ग्राहकांसाठी मार्गदर्शिका जारी
डिजिटल ट्रान्झॅक्शन
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक स्टेट बँकेने (STATE BANK OF INDIA) ग्राहकांसाठी सुरक्षा मार्गदर्शिका जारी केली आहे. डिजिटल व्यवहारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आर्थिक फसवणुकीची (ECONOMIC FRAUD) प्रकरणे मोठ्या संख्येने समोर आली आहे. ग्राहकांच्या सुरक्षित व्यवहारांसाठी मार्गदर्शिकेतून तपशील जारी करण्यात आला आहे. डिजिटल अर्थव्यवहार (DIGITAL TRANSACTION) करणाऱ्या ग्राहकांना नेमकं काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वंकष माहिती प्राप्त होईल. लॉग-इन सुरक्षा, इंटरनेट सुरक्षा, यूपीआय सुरक्षा आणि डेबिट व क्रेडिट कार्ड सुरक्षा आदी विषयी माहिती मार्गदर्शिकेत समाविष्ट आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी लॉग-इन संबंधित सुरक्षेसाठी ग्राहकांना कठीण पासवर्डचा वापर करण्याचे आणि वारंवार पासर्वड मध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

…तर, आर्थिक नुकसान :

वापरकर्त्यांनी आयडी, पासवर्ड किंवा पिन कुठेही लिहू नये. तसेच बँकेकडून किंवा बँकेचा नाव वापर करून कुणीही पिन, आयडी, पासवर्ड किंवा ओटीपीची मागणी केल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना बँकेच्या मार्गदर्शिकेत करण्यात आलेल्या आहेत.

इंटरनेट सुरक्षा :

बँकेच्या वेबसाईटवर नेहमी ‘http’ असल्याचे तपासा. सार्वजनिक ठिकाणी खुले वाय-फाय टाळा. डिजिटल व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नेहमी लॉग-आऊट करून ब्राऊझर बंद करा.

फोन टाळा, नुकसानीला आळा :

स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. तुम्हाला कोणत्याही माध्यमातून दोन क्रमांकावरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास सावधगिरी बाळगा. स्टेट बँक ग्राहकांना 8294710946 आणि 7362951973 या दोन क्रमांकावरुन केवायसी अपडेट करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन केले जात आहे. स्टेट बँकेने अशाप्रकारच्या बनावट लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.

ग्राहकांची सिक्युरिटी फर्स्ट :

स्टेट बँकेने ग्राहकांची सुरक्षा प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे. धोक्यांपासून दूर राहण्यासाठी बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. टेलि कॉलर, ईमेल आणि एसएमएस माध्यमातून प्राप्त होणाऱ्या संदिग्ध प्रस्तांवासापून सावध राहावे. तुमचा पासवर्ड नेहमी गुप्त ठेवा आणि विहित वेळेच्या कालमर्यादेत त्यामध्ये बदल करा. स्टेट बँकेशी संपर्क करण्यासाठी केवळ बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच संपर्क साधावा. सायबर तक्रार https://cybercrime.gov.in वर नोंदव्यात

इतर बातम्या :

SHARE MARKET : घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 617 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खाली

जीएसटीची पुन्हा लगीनघाई; नवीन वऱ्हाडींची सरबराई, 28 टक्के जीएसटीतंर्गत 143 वस्तुंचा समावेश होणार

Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव