मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIने आपल्या 42 कोटी ग्राहकांना एक भेट दिली आहे. SBIचे ग्राहक आता घर बसल्या बँकेच्या 9 सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार SBIच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेला YONO अॅप, वेब पोर्टल आणि कॉल सेंटरद्वारे अॅक्सेक केलं जाऊ शकतं. याशिवाय कामकाजाच्या दिवशी टोल फ्री नंबर 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 या नंबरवर सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान फोन करु शकता. SBI डोअरस्टेप बँकिंगे सेवांच्या अधिक माहितीसाठी https://bank.sbi/dsb या वेबसाईटलाही भेट देऊ शकता.(State Bank of India’s big gift to 42 crore customers)
बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी तुम्हाला रडिस्ट्रेशन करावं लागणार आहे. सुरुवातील धनादेश, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आदीचं पिक अप, फॉर्म 15G/15H चं पिक अप, IT/GST चलनाचं पिक अप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, टर्म डिपॉजिट रसीदची डिलीव्हरी आदी सेवा दिल्या जात आहेत. मात्र आता वित्तीय सेवाही उपलब्ध आहेत. PSBsचे ग्राहक कमी शुल्कात ही सेवा घरबसल्या मिळवू शकणार आहेत.
Your bank is now at your doorstep. Register for doorstep banking today!
To know more: https://t.co/m4Od9LFR3G
Toll-Free no. 1800 1037 188 or 1800 1213 721#DoorstepBanking #DSB #Banking #CashWithdrawal pic.twitter.com/nlfBxfklnP
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 23, 2021
कॅश विड्रॉव्हल
कॅश डिपाझिट
चेक मिळवणं
चेक मागणी
फॉर्म 15H पिकअप
ड्राफ्टची डिलिव्हरी
टर्म डिपॉझिट सूचनेची डिलिव्हरी
जीवन प्रमाणपत्र
KYC कागदपत्र
SBIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अंध व्यक्तींसह 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिक आणि दिव्यांग किंवा अशक्त व्यक्ती या सुविधांचा फायदा घेऊ शकतात. KYC पूर्ण केलेले खातेधारकही या सेवांचा फायदा घेऊ शकतात. यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमचा मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला असावा. वैयक्तिक खातेधारक. जॉईन्ट अकाऊंट होल्डर्स च्या प्रकरणात फर्स्ट अकाऊंट डोल्डर किंवा सेकंड अकाऊंट होल्डर. यासह होम ब्रँचपासून 5 किलोमीटर परिसरात रजिस्टर्ड पत्त्यावर राहणारे ग्राहक या सेवांचा फायदा उचलू शकतात.
देशातील ‘या’ तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत? RBI चं मोठं वक्तव्य
बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत
State Bank of India’s big gift to 42 crore customers