महायुती सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये राज्यातील जनतेसाठी काय खास असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज शुक्रवारी सादर होत आहे. पावसाळी अधिवेशनात सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घोषणांचा पाऊस पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून जनतेच्या पदरात काय पडते, याची सुद्धा चर्चा आहे. लोकसभा निवडमुकीतील हाराकिरी आणि विधानसभा खिशात घालण्यासाठी राज्य सरकार मोठ्या घोषणा करणार हे तर निश्चित आहे. राज्यातील मोठ्या वर्गाला आपलंस करण्यासाठी खास योजना आणण्यात येतील असे दिसते. राज्यातील जनतेला या अंतरिम बजेटची सगळी अपडेट या ठिकाणी पाहता येईल.
काय आहे अर्थमंत्र्यांच्या पतोडीत?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारचे अंतरिम बजेट सादर करतील. या बजेटकडून सर्वसामान्यांपासून तर शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना घोषणांचा पाऊस न पाडता ठोस काही मिळण्याची अपेक्षा आहे. अल्प व मध्यम शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज, महिलांसाठी लाडली दीदी योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, सध्या राज्यात गाजत असलेल्या ओबीसी-मराठा आरक्षणावरुन दोन्ही समाजासाठी आणि इतर समाजासाठीच्या खास योजना, शैक्षणिक सवलतींवर भर, शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठीची खास तरतूद, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या ठिकाणी पाहाल बजेट?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. आज दुपारी २ वाजता हा अर्थसंकल्प सादर होईल. राज्याचा अर्थसंकल्प साध्या, सोप्या भाषेत तुम्ही टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीसह सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहु शकाल. टीव्ही 9 मराठी वेबसाईट tv9marathi.com आणि ॲपवर तुम्हाला बजेटच्या सर्व अपडेट मिळतील.
टीव्ही 9 मराठीचे व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक पेज, एक्ससह इतर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बजेटसंबंधीचे सर्व अपडेट मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या youtube.com सुद्धा तुम्हाला लाईव्ह बजेट पाहता येईल. या बजेटसंबंधीच्या अपडेट तुम्हाला लाईव्ह ब्लॉगमधून सुद्धा पटकन कळतील.
या ठिकाणी पाहा संपूर्ण अर्थसंकल्प