Good News on GST : GST रिटर्न भरायचं राहीलं आहे, घाबरण्याचं कारण नाही; जूनपर्यंत भरू शकता GST रिटर्न, द्यावाही लागणार नाही लेट फी

| Updated on: May 27, 2022 | 3:54 PM

QRMP योजनेतंर्गत जीएसटी करदात्याला रिटर्न करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एप्रैल 2022 महिन्यातील देय कर PMT^-06 फॉर्म/चलन द्वारा टॅक्स जमा करू शकता. तर यानंतर टॅस्क भरल्याल तुम्हाला दंड हा भरावा लागेल.

Good News on GST : GST रिटर्न भरायचं राहीलं आहे, घाबरण्याचं कारण नाही; जूनपर्यंत भरू शकता GST रिटर्न, द्यावाही लागणार नाही लेट फी
जीएसटी
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : देशातील अनेक छोटे-मोठे व्यापारी (Traders) GST रिटर्न भरण्यावरून चिंतेत होते. काहींची ही चिंता मिटली आहे. तर काहींची झोप उडालेली. अनेकांनी GST रिटर्न भरला नसल्याने आता काय करायचं याविचारांच्या गर्तेत होते. मात्र त्या व्यापारींची चिंता आता मिटली आहे. त्यांच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ती म्हणजे जीएसटी रिटर्न (GST Returns) भरण्याची तारिख ही वाढविण्यात आली असून अंतिम तारिख ही 30 जून आहे. विशेषबाब म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 साठी GSTR-4 भरण्यासाठी 1 मे ते 30 जून 2022 पर्यंत विलंब शुल्क आकारले जाणार नाही. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे. CBIC ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी GSTR-4 भरण्यासाठी 1 मे ते 30 जून 2022 पर्यंत विलंब शुल्क आकारले जाणार नाही. कंपोझिशन स्कीम (Composition Scheme) अंतर्गत नोंदणीकृत लहान करदात्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्यास झालेल्या विलंबासाठी जूनपर्यंतचे दोन महिन्यांचे विलंब शुल्क सरकारने गुरुवारी माफ केले.

कोणताही व्यापारी GST कंपोझिशन स्कीम निवडू शकतो

कंपोझिशन स्कीम अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांनी दरवर्षी GSTR-4 दाखल केला जातो. GST कायद्यानुसार, GSTR-4 भरण्यास उशीर झाल्यास 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क म्हणून आकारले जाते. तथापि, जेथे देय कराची एकूण रक्कम शून्य आहे, तेथे कमाल 500 रुपये विलंब शुल्क म्हणून आकारले जाऊ शकते. इतर सर्व प्रकरणांसाठी जास्तीत जास्त 2,000 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. तर ज्यांची उलाढाल 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, तो कोणताही व्यापारी GST कंपोझिशन स्कीम निवडू शकतो. मात्र, ईशान्येकडील राज्यांतील व्यावसायिकांसाठी ते ७५ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, उत्पादक आणि व्यापाऱ्यांना 1 टक्के जीएसटी भरावा लागतो. तर रेस्टॉरंटसाठी 5 टक्के आणि इतर सेवा पुरवठादारांसाठी 6 टक्के जीएसटी भरावा लागतो.

वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणतात

एएमआरजी आणि असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की, लहान करदात्यांच्या सोयीसाठी, सरकारने 30 जून 2022 पर्यंत आर्थिक वर्ष 2021-22 साठी फॉर्म GSTR-4 भरण्यास विलंब शुल्क माफ केले आहे. सरकारचे हे चांगले पाऊल असल्याचे मोहन म्हणाले. यामुळे अनेक रचना करदात्यांना गैर-अनुपालन खर्च टाळण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

QRMP योजनेनुसार आजचा शेवटचा दिवस

QRMP योजनेतंर्गत जीएसटी करदात्याला रिटर्न करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एप्रैल 2022 महिन्यातील देय कर PMT^-06 फॉर्म/चलन द्वारा टॅक्स जमा करू शकता. तर यानंतर टॅस्क भरल्याल तुम्हाला दंड हा भरावा लागेल.