Stock Market Crash : Sensex 1650 अंकांनी धडाम; 10 लाख कोटी बुडाले, इराण-इस्त्रायल युद्धाच्या दहशतीत शेअर बाजार

| Updated on: Oct 03, 2024 | 2:35 PM

Iran-Israel Impact on Stock Market : शेअर बाजारात इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव वाढल्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजार उघडताच कोसळला. अनेक शेअर गडगडले. या धामधुमीत गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले.

Stock Market Crash : Sensex 1650 अंकांनी धडाम; 10 लाख कोटी बुडाले, इराण-इस्त्रायल युद्धाच्या दहशतीत शेअर बाजार
सेन्सेक्स गडगडला
Follow us on

इराण आणि इस्त्रायल युद्धाने उग्र रुप धरले. युद्धाचे ढग गडद होताच भारतीय शेअर बाजारात पडझड नाही तर तुफान आले. बाजारात धडाधड कोसळला. सेन्सेक्स धडाम आपटला. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 1650 अंकांनी आपटला. या घसरणीमुळे BSE Market Cap घसरले. एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींहून अधिक रुपये स्वाहा झाले. गुंतवणूकदारांना गेल्या दोन दिवसांपासून बाजारात घसरणीची मोठी लाट येण्याची भीती होती, ती खरी ठरली. गेल्या दोन आठवड्यात बाजारात आलेल्या तेजीच्या सत्राला या घाडमोडींमुळे मोठा धक्का बसला.

युद्धाच्या चिंतेने बाजाराची दशा बिघडली

इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरातील शेअर बाजाराची दिशा आणि दशा बदलली. सर्वच शेअर बाजार दहशतीखाली आले. भारतीय शेअर बाजारावर गुरुवारी त्याचा परिणाम दिसून आला. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला योग्य वेळ येताच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार इस्त्रायलने व्यक्त केला आहे. त्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली. BSE Sensex सोमवारी अखरेच्या सत्रात 84,266 अंकावर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 995 अंकांनी आपटला. तो 83,270 अंकावर आला. तर दुपारी 2:24 वाजता शेअर बाजार 1,751.90 अंकांनी आपटला. शेअर बाजार सध्या 82,512.39 वर व्यापार करत होता.

हे सुद्धा वाचा

बीएसई मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरच्या सेन्सेक्समध्ये मोठी घसरण आली. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील एकूण भांडवल गेल्या वेळेपेक्षा 475.96 लाख कोटी रुपयांनी घटले. बीएसई मार्केट कॅप 467.67 लाख कोटींच्या घरात घटले. एका झटक्यात गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचा फटका बसला.

हे शेअर विखुरेल, गुंतणूकदार बेहाल

गुरुवारी शेअर बाजारात भूकंप आला. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्ससह इतर अनेक शेअरमध्ये मोठी घसरण झाली. बीएसईमधील मोठ्या 30 कंपन्यांपैकी 28 शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. यामध्ये 2 ते 4 टक्क्यांची घसरण दिसली. यामध्ये BPCL Share 4.60 टक्के, Tata Motors Share 3.80 टक्के, Asian Paints Share 3.66 टक्के, L&T Share 3.41 टक्के, Reliance Share 2.55 टक्के, Bajaj Finance Share 2.51 टक्के, Axis Bank Share 2.45 टक्के, Adani Ports Share 2.30 टक्के, Maruti Share 2.16 टक्के आणि ICICI Bank Share 1.90 टक्के घसरला.