Stock Market : क्या बात है, गुंतवणूकदारांसाठी एका तासांचा स्पेशल शेअर ट्रेडिंग, दिवाळीच्या सुट्यांमध्ये या दिवशी साधा मुहूर्त

| Updated on: Oct 22, 2022 | 7:26 PM

Stock Market : दिवाळीच्या सुट्यांमध्येही गुंतवणूकदारांसाठी एका तासांचा स्पेशल शेअर ट्रेडिंग असणार आहे.

Stock Market : क्या बात है, गुंतवणूकदारांसाठी एका तासांचा स्पेशल शेअर ट्रेडिंग, दिवाळीच्या सुट्यांमध्ये या दिवशी साधा मुहूर्त
शेअर बाजारात साधा मुहूर्त
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : शेअर बाजारात दिवाळीत सुट्यांचा सुकाळ (Stock Market Holiday) असतो. चार दिवस या काळात व्यवहार ठप्प असतो. रोज ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा कालावधी हिरमोड करणारा ठरतो. सणाचा आनंद घेतानाच त्यांना कमाईचाही मुहूर्त साधायचा असतो. अशावेळी गुंतवणूकदारांसाठी बाजारात एक तासांचा स्पेशल शेअर ट्रेडिंग (Special Share Trading) होणार आहे.

दिवाळीनिमित्त मुंबई स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE एकूण चार दिवसांसाठी बंद राहतील. पण तरीही गुंतवणूकदार, ब्रोकर्स यांच्यासाठी बाजारात खास एक तासांचा व्यवहार करण्यात येणार आहे.

24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हा स्पेशल शेअर ट्रेडिंग असेल. या एका तासात शेअर बाजार, इक्विटी, डेरिवेटिव्स, करन्सी, कमोडिटी आणि इतर सिक्युरिटीज बाजारात ट्रेड करता येणार आहे. त्यामुळे एका तासात कमाईचा मुहूर्त साधता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबरमध्ये दिवाळीने मुहूर्त साधला आहे. या काळात केवळ स्टॉक बाजारच नाहीतर सर्व बँका, सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या यांना सुट्टी असते. बाजारातही चार दिवस कामकाज ठप्प असेल.

BSE च्या अधिकृत bseindia.com वेबसाईटनुसार, India share market मध्ये equity segment, equity derivative segment आणि SLB Segment रविवारी आणि सोमवारी बंद राहतील. मंगळवारी कामकाज असेल.

BSE आणि NSE च्या संकेतस्थळानुसार, पुढील आठवड्यात चार दिवस स्टॉक मार्केट बंद असेल. 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी, लक्ष्मी पुजनासाठी आणि 26 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदेला बाजार बंद असेल.

24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हा स्पेशल शेअर ट्रेडिंग असेल. या शुभ मुहूर्तावर व्यापारी, गुंतवणूकदार एक तासासाठी शेअर ट्रेडिंग करतील. याला मुहूर्त ट्रेडिंग असे ही म्हणतात.