Stock Market : शेअर बाजार सर्व रेकॉर्ड तोडणार, एका वर्षात निफ्टी करणार 21,200 अंकाची चढाई..

| Updated on: Dec 16, 2022 | 11:59 PM

Stock Market : पुढील वर्षी शेअर बाजार नवीन उच्चांक प्रस्थापित करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे..

Stock Market : शेअर बाजार सर्व रेकॉर्ड तोडणार, एका वर्षात निफ्टी करणार 21,200 अंकाची चढाई..
रिलायन्स कॅपिटलच्या शेअरमध्ये उसळी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : नवीन वर्षात शेअर बाजार (Share Market) उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्ष 2023 सुरु होणार आहे. सध्या बाजारात सातत्याने चढउतार होत आहे. बाजारात उच्चांकी आणि नीच्चांकी लाट येत आहे. वास्तविक तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसने (Brokerage Houses) शेअर बाजाराविषयी विश्वास वर्तविला आहे. या सर्वांच्या दाव्यानुसार, पुढील वर्षी सर्वच क्षेत्रात तेजी दिसून येत असल्याने निफ्टी (Nifty) 21200 अंकाचा स्तर सहज गाठेल.

ब्रोकरेज हाऊस ICICI Securities ने दावा केला आहे की येत्या काळात बाजारातील अस्थिरता कमी होईल. विदेशी गुंतवणूकदार येत्या काही दिवसात अधिक गुंतवणूक करतील. पुढील वर्षी बँकिंग, मेटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तेजी दिसून येईल.

येत्या काळात Bharat Forge, Hindalco, Mindtree, MCX, SBI, Sun Pharma या कंपन्या जास्त परतावा देतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अर्थात हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तर एक अंदाज आहे. तुमच्या गुंतवणूकदार सल्लागाराच्या मदतीने तुम्हाला बाजारात गुंतवणूक करता येईल.

हे सुद्धा वाचा

ब्रोकरेज हाऊस ICICI Securities नुसार, बाजारातील चढउताराचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. त्यांना प्रॉफिट बुक करता आले.यापूर्वी 2015, 2018 आणि 2020 मध्ये असा प्रकार समोर आला आहे. त्याचाच फायदा आता होण्याची शक्यता आहे.

गेल्या 15 वर्षांत प्रथमच, निफ्टी विक्रमी उच्चांकाच्या जवळ असला तरी गुंतवणूकदारांना त्याचा हवा तसा फायदा घेत येत नसल्याचे दिसून येते. विशेषत: बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल निफ्टीला धक्का देण्याची शक्यता आहे. त्यामुळे निफ्टी 21200 अंकांचा पल्ला सहज गाठू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अहवालानुसार, oil & gas क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रात तेजीचे वारे वाहू लागले आहे. त्यात आता तंत्रज्ञान क्षेत्राचीही भर पडली आहे. आर्थिक क्षेत्रातही कमालीची वृद्धी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.