मुंबई : भारतीय शेअर बाजाराला (Stock market) लागलेल्या घसरणीचे ग्रहण काही केल्या सुटताना दिसत नाहीये, आज पुन्हा एकदा शेअर बाजारात पडझड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये (Sensex) 682 अकांची घसरण झाली असून, 682 अंकाच्या घसरणीसह सेन्सेंक्स 53,682 अंकांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये (Nifty) देखील 208 अंकांची घसरण झाली आहे. सध्या निफ्टी 16,031 अंकांवर व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात सुरू झालेले घसरणीचे सत्र आज देखील सुरूच आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्समध्ये तब्बल 800 अकांची घसरण पहायला मिळाली होती. त्यानंतर चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सेन्सेक्स घसरला.आज शेअर बाजार सुरू होताच शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून येत होती. सेन्सेक्स 190 अंकांनी वाढला होता. सेन्सेक्स वाढत असल्याने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा अल्पकाळ राहीला पुन्हा सेन्सेक्सच्या घसरणीला सुरुवात झाली. आज सेन्सक्स तब्बल सहाशे अंकांनी कोसळला.
शेअर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून घसरण पहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल आठशे अंकांनी कोसळला होता. आठशे अंकाच्या घसरणीसह बाजार बंद झाला. चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजरा सुरू होताच शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली सेन्सेक्स आठशे अकांनी कोसळला होता. मात्र त्यानंतर या घसरणीतून शेअर बाजार काहीसा सावरला घसरणीतील अंतर कमी होऊन शेअर मार्केट 163 अकांच्या घसरणीसह बंद झाले. मंगळवारी देखील सेन्सेक्समधील घसरण कायम राहिली. आज सकाळी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये तेजी दिसून येत होती. मात्र पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये घसरणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत सेन्सेक्स सहाशे अकांनी कोसळला आहे. सेन्सेक्सला लागलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.
सलग चार दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम असून, गुंतवणूकदारांचे आतापर्यंत कोट्यावधी रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढला आहे. ही स्थिती केवळ एकट्या भारताचीच आहे असे नाही, तर जागतिक स्थरावर सर्वच शेअर मार्केटमध्ये कमी अधिक फरकाने ही स्थिती दिसून येत आहे. घसरणीचा फटका हा शेअर मार्केटमधील परदेशी गुंतवणुकीला देखील बसला आहे.