Stock Split | गुंतवणूकदारांना लॉटरी, 1 च्या मोबदल्यात 10 शेअरची पर्वणी, कोणती ही कंपनी

| Updated on: Oct 19, 2023 | 5:49 PM

Stock Split | मॅगी तयार करणारी ही कंपनी ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता या कंपनीने एकाच दिवसात गुंतवणूकदांना मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे त्यांचे वारे-न्यारे झाले आहेत. कंपनीच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिटला मंजूरी दिली आहे. एकाच्या बदल्यात गुंतवणूकदारांची 10 शेअरची कमाई होणार आहे.

Stock Split | गुंतवणूकदारांना लॉटरी, 1 च्या मोबदल्यात 10 शेअरची पर्वणी, कोणती ही कंपनी
Follow us on

नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : मॅगी आणि कॉफीच्या माध्यमातून ग्राहकांच्या मनावर या कंपनीने गारुड केले आहे. या कंपनीने तिसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केली आहे. या आर्थिक वर्षात कंपनीला जोरदार फायदा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांसाठी मोठी ऑफर दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एका शेअरच्या बदल्यात 10 शेअर देण्यास मंजूरी दिली आहे. शेअर स्प्लिटसोबतच कंपनीने प्रति शेअर 140 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकाश ठेंगणे झाले आहे. कंपनीने डबल धमाका केला आहे.

नेस्लेचा डबल धमाका

नेस्ले इंडियाने (Nestle India) ही खास ऑफर आणली आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 37.28% वाढ होऊन तो 908.08 कोटी झाला. कंपनीने प्रति शेअर 140 रुपयांचा अंतरिम लाभांशाची घोषणा केली. एका शेअरच्या बदल्यात 10 शेअर देण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअरवर दिसून आला. दुपारी तीन वाजता शेअरमध्ये 913.40 रुपयांची तेजी आली. हा शेअर 24,183.05 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

अशी चमकदार कामगिरी

नेस्ले इंडिया लिमिटेडने शेअर बाजाराला माहिती दिली. त्यानुसार, तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत 9.43 टक्क्यांची वाढ होऊन ती 5,009.52 कोटी रुपयांवर पोहचली. गेल्या वर्षी याच कालावधीत 4,577.44 कोटी रुपये होती. जुलै-सप्टेंबरया तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 5.92 टक्क्यांनी वाढला, तो 3,954.49 कोटी रुपयांवर पोहचला. नेस्ले इंडियाच्या देशातील विक्रीत 10.33 टक्क्यांची वाढ होऊन ती 4,823.72 कोटी रुपयांवर पोहचली. कंपनीची निर्यात 9.56 टक्क्यांनी घसरली. कंपनीचा महसूल जुलै ते सप्टेंबर महिन्यात 9.45 टक्क्यांनी वाढून 5,036.82 कोटी रुपयांवर पोहचला.

Stock Split चा फायदा काय

या कंपनीच्या संचालक मंडळाने एक शेअरच्या बदल्यात 10 शेअर देण्यास, शेअर स्प्लिटला मंजूरी दिली. 10 रुपये मूल्यांचा शेअर 10 इक्विटी शेअरमध्ये वाटला जाईल. त्याची फेस व्हॅल्यू एक रुपया असेल. या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अधिक शेअरची खरेदी करता येईल. त्यांना शेअर खरेदी करता येईल. स्टॉक स्प्लिटमुळे हा शेअर आता स्वस्त होईल. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पण तो खरेदी करता येईल. बाजारात कंपनीच्या शेअरची संख्या वाढेल. स्टॉक स्प्लिट पूर्वी शेअरची संख्या 9.64 कोटी होती, स्टॉक स्प्लिटनंतर ही संख्या 96.42 कोटी रुपये होईल.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.