मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने आपल्या सबस्क्राईबर्ससाठी PF अकाऊंटमध्ये सुधारणांसाठी अनेक पावलं उचलली आहेत. EPFO ने PF खातेधारकांचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख आदी सुधारणांसाठी सुविधा दिली आहे. पण आता PF अकाऊंटची सुरक्षा अधिक कडक केली आहे. आता PF खातेधारक अकाऊंटमध्ये आपलं नाव आणि प्रोफाईलमध्ये बदल करु शकत नाही. PF अकाऊंटच्या प्रोफाईलमध्ये ऑनलाईन बदल केल्यास रेकॉर्डमध्ये काही चूका होण्याची शकत्या असते. त्यामुळे काही तुमच्या खात्याला काही धोकाही निर्माण होऊ शकतो.(Now the new rules of EPFO for making changes in PF account)
PF अकाऊंटमध्ये KYCच्या नावावर आतापर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत. अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने आपले नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. EPFOच्या सुधारणांनुसार आता खातेधारक नाव, वडील किंवा पतीचं नाव, जन्मतारीख, लिंग यातील त्रुटी दूर करु शकतो.
नव्या नियमावलीनुसार विना कागदपत्रांच्या पीएफ अकाऊंटमध्ये खातेधारकांची माहिती बदलणार नाही. पण नावात काही छोटे बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी EPFO प्रमाणपत्रांची पडताळणी करेल. त्यानंतरच प्रोफाईलमध्ये काही बदल केला जाऊ शकतो. EPFO ने आपल्या सर्क्यूलरमध्ये म्हटलं आहे की, क्षेत्रीय कार्यालय कोणत्याही कागदपत्रांच्या पुराव्याविना कोणत्याही खातेधारकांच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा करु शकत नाही.
PF खात्यात नाव, जन्मतारीख, नॉमिनी, पत्ता, वडील किंवा पतीचे नाव यांमध्ये बदल करायचा झाल्यास तो कुठल्याही कागदी पुराव्याविना करता येणार नाही. KYC मध्येही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बदल तेव्हाच मान्य केला जाईल जेव्हा खातेधारकाचे पुरावे अपलोड होतील. जर एखादी संस्था बंद झाली असेल तर कागदपत्रांमध्ये सॅलरी स्लिप, अपॉईंटमेंट लेटर आणि PF स्लिपही दाखवावी लागेल.
संबंधित बातम्या :
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम : फक्त 100 रुपयात खातं उघडा आणि मिळवा 7000 रुपये
PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम
new rules of EPFO for making changes in PF account