नवी दिल्ली : पिवळधम्मक सोने (Gold Price Today) पुन्हा एकदा चकाकले आहे. नुसते चकाकले नाही तर त्याच्या भावाने अनेकांचे डोळे दिपले आहेत. सोन्याने जोरदार मुसंडी मारली आहे. सोने रॉकेटसिंग झाले आहे. सोमवारपासून सुरु असलेली सोन्याची मुलूखगिरी काही केल्या थांबताना दिसत नाही. भावात एक एक टप्पा पार करत सोने पुन्हा त्याच्या विक्रमी भावाजवळ येऊन ठेपले आहे. आज दिवसभरात सोने त्याच्या विक्रमाला गवसणी तरी घालेल अथवा हा विक्रम तरी मोडीत काढेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे. सोन्याने घेतलेली ही उसळी अनेकांना धक्का देणारी आहे. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा (International Affairs) परिणाम डॉलरवर झाला असून, गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला जवळ केले आहे. त्यासोबतच चांदीने विक्रमाकडे (Silver Price Today) धाव घेतली आहे.
यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी भावात, सोन्याने 58,880 रुपये तोळा तर चांदीने प्रति किलो 74,700 रुपये असा रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. त्यानंतर सोने सातत्याने घसरणीवर होते. मध्यंतरी एक महिना सोने-चांदीचे भाव एका निश्चित किंमतीच्या बाहेर गेले नाही. या आठवड्यात सोने-चांदीने मुड बदलत तुफान बॅटिंग केली आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर चांदीनेही दरवाढीची गुढी उभारली आहे.
3000 रुपयांची सूसाट वाढ
गुरुवारी सोन्याने थोडा ब्रेक घेतला. पण शुक्रवारी किंमती पुन्हा भडकल्या. 17 मार्च रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाली. 22 कॅरेट सोने प्रति तोळा 500 रुपयांनी वाधारुन 53,700 रुपये झाले. तर 24 कॅरेट सोन्यात 550 रुपयांची प्रति 10 ग्रॅम वाढ होऊन हा भाव 58,700 रुपये प्रति तोळा झाला. गेल्या शुक्रवारी 10 मार्च रोजी सोने 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. त्यावेळी भाव 55669 रुपये होता. आठवड्याभरात 3031 रुपयांची वाढ झाली.
असा झाला बदल