नवी दिल्लीः वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालणं हा लोकांसाठी एक ट्रेंडच झालाय. परंतु लोकांसाठी फॅशनेबल कपडे बनवणाऱ्या प्रसिद्ध बँड असलेल्या पँटालूनच्या मालकांबद्दल तुम्हाला माहीत आहे का? लोकांसाठी फॅशनेबल कपडे बनवणाऱ्या कंपनीचे मालक किशोर बियाणी (kishor biyani) अतिशय साधे जीवन जगतात. किशोर बियाणी अनेक ब्रँडचे मालक आहेत, पण तरीही ते आपल्या जीवनात अतिशय साधेपणा अंगीकारत आहेत. किशोर बियाणी हे असेच एक नाव आहे, जे भारतातील आधुनिक रिटेल क्षेत्राचे अग्रणी म्हणून ओळखले जातात.
रिटेल किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या किशोर बियाणी यांनी शॉपिंग सोपे करून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. किशोर बियाणी यांनी फ्यूचर ग्रुपच्या फ्युचर रिटेलच्या माध्यमातून किरकोळ व्यवसायाचे संपूर्ण साम्राज्य निर्माण केले. किशोर बियाणी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1961 रोजी मुंबईस्थित कापड व्यापाऱ्याच्या घरात झाला. त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात खूप रस दाखवला. 1987 मध्ये किशोर बियाणी यांनी आपल्या कपड्यांचा व्यवसाय रेडिमेड कपड्यांकडे वळवला.
सुरुवातीला किशोर बियाणींना स्टोन वॉश फॅब्रिक व्यवसायात बरेच यश मिळाले, ज्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. किशोर बियाणी त्यावेळी काहीतरी नवीन करण्याची संधी शोधत होते. किशोर यांना असे काहीतरी करायचे होते, ज्याद्वारे देशभरातील जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधता येईल. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी Menzwear प्रायव्हेट लिमिटेड सुरू केले. व्यवसाय सुरू केल्यानंतर किशोर बियाणी यांनी वस्त्रोद्योग समजून घेण्यासाठी पाच वर्षे घालवली. मग किशोर बियाणी यांनी रेडिमेड कपड्यांचा निर्माता म्हणून व्यवसाय सुरू केला आणि दोन ब्रॅण्ड बनवले.
अल्पावधीतच किशोर बियाणींनी आपल्या ब्रँडचे नाव बदलून पँटालून ठेवले. वर्ष 1992 मध्ये किशोर बियाणी यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये पँटालून लिस्टिंग केले, जेणेकरून पैसे जमा करता येईल. यानंतर किशोर बियाणीने मागे वळून पाहिले नाही, कारण त्यांनी किरकोळ व्यवसायाची संपूर्ण इकोसिस्टम तयार केली. किशोर बियाणींनी कपड्यांच्या व्यवसायात एक क्रांतिकारी बदल घडवून आणला. नव्या युगात याला फॅशनचे नाव देण्यात आले. लोक टेलरकडे जाण्याऐवजी रेडिमेड कपडे खरेदी करण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये जाऊ लागले.
फ्युचर ग्रुपने 2001 मध्ये बिग बाजारचे पहिले स्टोअर उघडले. 2006 पर्यंत त्यांची संख्या 56 पर्यंत वाढली आणि 2008 पर्यंत त्यांची संख्या 116 वर गेली. 2008 च्या मंदीचा कंपनीवर वाईट परिणाम झाला असला तरी कंपनी वाढतच राहिली. दरवर्षी नवीन दुकाने उघडत राहिली आणि 2019 पर्यंत एकूण 295 स्टोअर्स होती. किशोर बियाणी यांनी संपूर्ण बाजार भारतीय मध्यमवर्गाला एका छताखाली दिला. बिग बाजार भारताचा वॉलमार्ट म्हणूनही ओळखला जातो.
संबंधित बातम्या
Share Market Updates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात वाढ, सेन्सेक्स 54400 च्या पुढे
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, व्यापाऱ्यांचा मोठा विजय
Success Story: How did Kishore Biyani, who sells pant for Rs 99, make a pantalon worth Rs 9000 crore? Read detailed