नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : आयआयटीतून इंजिनिअरींग केल्यानंतर जर 28 लाखाचे तगडे पॅकेज मिळत असेल तर कोणीही स्विकारल असते. परंतू काही तरुणांना स्वत:चा व्यवसाय निर्माण करायचा असतो. तेलंगणा येथील आयआयटी ग्रॅज्युएट सैकेश गौंड यांची कहानी काहीशी अशीच आहे. त्यांना 28 लाखाचे पॅकेज मिळाले असतानाही त्यांनी स्वत:चा देशी कोंबड्यांच्या चिकन विक्रीचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांना महिन्याला एक कोटी रुपयांची कमाई होत आहे. आज त्यांच्याकडे स्वत:चा प्रसिद्ध चिकन ब्रॅंड असून ते यशस्वी उद्योजक आहेत.
सैकेश गौंड यांनी वाराणसी आयआयटीतून मॅकेनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांना 28 लाखाच्या पॅकेज मिळाले. परंतू त्यांना बिझनेस सुरु करायचा होता. त्यांची भेट कोंबडी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या हेमाम्बर रेड्डी या व्यक्तीशी झाली. त्यानंतर त्यांना चिकन मार्केटचे मार्केट खुणावू लागले. त्यानंतर त्यांनी रिटेल मीट मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जॉब सोडून हाच व्यवसाय सुरु केला.
गौंड यांच्या व्यवसायाला एका इन्क्युबेशन प्रोग्रॅमने मोठी मदत केली. हैदराबादच्या आयसीएआर नॅशनल मीट रिसर्च इन्स्टीट्यूटने त्यांना हायजेनिक प्रोसेसिंग आणि रिटेलिंग युनिट आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टीसेसची स्थापणेसाठी मदत केली. त्यानंतर हेमाम्बर रेड्डी, मो.सामी उद्दीन आणि सैकेश गौंड यांनी मिळून कंट्री चिकन कंपनीची साल 2020 साली स्थापना केली. त्यांना चिकन मीटचे असे दुकान आणायचे होते जे सुपरमार्केट सारखे आलिशान दिसेल. जेथे स्वच्छ हायजिन देशी चिकन मिळेल. आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरले.
आयआयटी करूनही कोंबड्या पालन करतोय म्हणून त्यांची चेस्टामस्करी केली गेली. परंतू गौड काही थांबले नाही. त्यांनी देशी कोंबड्यांची चांगली चव, दर्जेदार प्रोडक्शन आणि न्युट्रिशन व्हॅल्यूमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. ते प्रोडक्ट गिफ्ट पॅकेट सारखे पॅक करुन करुन विकू लागले. त्यामुळे चिकन खरेदीचा ग्राहकांचा कलच बदलला. सैकेश गौड यांनी एकाच वर्षात व्यवसाय वाढविला. त्यांनी हैदराबादच्या प्रगतीनगर आणि कुकटपल्ली विभागात मित्रांच्या मदतीने देशातील पहिला ऑथेन्टिक देशी चिकन सेंटर उघडले. या आऊटलेटमध्ये 70 हून अधिक लोकांना त्यांनी नोकरी दिली. दक्षिणेकडील राज्यात कंपनीने 15 हजार पोल्ट्री शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार केले. त्यांच्याकडून जादा दराने चिकन खरेदी केले.
तेलंगणात वॉरियर, कडकनाथ आणि असिल या देशी चिकनवर त्यांनी लक्ष्य पुरविले. कंट्री चिकनमध्ये पाच प्रकारचे चिकन मिळते. टेंडर तेलंगना, क्लासिक आंध्र, मैसूर क्वीन, कडकनाथ आणि वारियर-पांडेम कोडी अशी त्यांची नावे आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीला 5 कोटी उत्पन्न मिळाले. जाने.2022 मध्ये 3 लाख प्रति महिना ते एप्रिल 2023 मध्ये 1.2 कोटी प्रति महिना महसूल मिळवित आहे. पुढच्या आर्थिक वर्षांत 50 कोटी महसूल मिळविण्याचा कंपनीचा इरादा आहे.