मुंबई : आजकाल प्रत्येकाला आपल्या नोकरीसह एखादा जोड व्यवसाय असावा, असे वाटते. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे अनेक पर्याय आपल्याला मिळतील. ज्यापैकी एक ‘नर्सरी’ व्यवसाय देखील आहे. राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात राहणारे आकाशदीप वैष्णव नर्सरीचा व्यवसाय करतात. ज्यामुळे त्यांना बराच आर्थिक फायदा झाला आहे. सध्या त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 30 लाख इतकी आहे. त्यांच्याशी झालेल्या संवादाच्या आधारे आम्ही तुम्हाला स्वतःचा नर्सरी व्यवसाय कसा सुरू करावा, याविषयी माहिती देणार आहोत (Success story of nursery business).
आकाशदीप हे काम जवळपास तीन ते चार वर्षांपासून करत आहेत. आकाशदीप म्हणतात की, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. यामुळे त्यांनी बारावीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही काळानंतर त्यांना नोकरी मिळाली. जिथे त्यांना बराच पगार मिळू लागला. यानंतर त्यांनी बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. पण त्यांना नोकरी करण्याची आवड नव्हती. 2016मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि नव्या कल्पनांवर काम करण्यास सुरुवात केली. काही संशोधनानंतर आकाशदीपने नर्सरी व्यवसायाबद्दल वाचले आणि या बद्दल अधिक माहिती नसतानाही, त्यांनी या क्षेत्रात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
आकाशदीपने सुरुवातीला एक छोटी रोपवाटिका उभारली. जिथे त्यांनी काही रोपे लावली पण माहितीअभावी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी एका तज्ज्ञांना भेटून त्यावर प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. या दरम्यान त्यांनी बेंगळुरू आणि नोएडा येथे प्रशिक्षण घेतले आणि अनेक सेमिनारमध्येही भाग घेतला. जिथून त्यांना वनस्पती आणि त्यांच्या विविध प्रकारांविषयी माहिती मिळाली.
सुरुवातीला ते लोकांच्या घरातील गरजांनुसार वनस्पतींचा पुरवठा करत असत व त्यांचा अभिप्रायही घेत असत. ज्यानंतर मागणी वाढली आणि मोठ्या संख्येने वनस्पतींचे कंत्राट त्यांना मिळू लागले. यानंतर त्यांनी ऑनलाईन ऑर्डरही घेण्यास सुरुवात केली. ते वनस्पतींच्या देखभालीसंबंधित वस्तू देखील विक्रीस ठेवतात, ज्यात भांडे, खत यासारख्या गोष्टी समाविष्ट असतात (Success story of nursery business).
आकाशदीप म्हणतात तुम्हाला नर्सरी व्यवसाय सुरू करायचा असेल, तर प्रथम मार्केट रिसर्च करावा लागेल. यावरून आपल्याला वनस्पतींची मागणी आणि ती झाडे कोठे मिळतील याची माहिती मिळवू शकता. कारण जर आपण घाऊक बाजारातून रोपे कमी किंमतीत घेत असाल, तर आपण त्यातून बरेच पैसे वाचवू शकाल.
आकाशदीपच्या नर्सरी दक्षिण भारतातून वनस्पती आणल्या जातात. यासाठी ते एजंटांवर अवलंबून नसतात, त्याऐवजी ते रोपे तयार करणार्या शेतकर्यांना भेटतात. शेतकर्यांकडून उत्पादन घेतल्याने केवळ शेतकर्यांनाच नव्हे तर, विकत घेणाऱ्यांचाही फायदा होतो. तसेच वनस्पतींविषयी माहितीही मिळते. याद्वारे, ग्राहकांना वनस्पतींविषयी अधिक माहिती देखील दिली जाऊ शकते.
नर्सरी व्यवसायाच्या सुरूवातीस, कधीही जास्त मजूर ठेवू नका. कारण सुरुवातीला अधिक खर्च व्यवसायाला हानी पोहोचवू शकतो. आकाशदीपसुद्धा सुरुवातीला स्वतः काम करायचे किंवा त्याच्या कुटुंबातील लोक त्यांना मदत करायचे. पण व्यवसाय जसजसा वाढला, तसतसे त्यांनी 10 ते 12 जणांना कामावर ठेवले. सध्या आकाशदीपकडे 2 हजाराहून अधिक वनस्पतींचे प्रकार आहेत.
(Success story of nursery business)
स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय, ‘या’ 5 बेस्ट ऑप्शनचा विचार करा, पहिल्या दिवसापासून कमाई#smallbusiness #business #bakery #money https://t.co/u6bHxMCkFg
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020