Sundar Pichai : गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती ? पॅरेंट कंपनी अल्फाबेटने केला खुलासा

| Updated on: Apr 22, 2023 | 5:55 PM

सुंदर पिचाई यांना मिळालेले पॅकेज अल्फाबेटच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या तुलनेत जास्तच आहे.

Sundar Pichai : गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती ? पॅरेंट कंपनी अल्फाबेटने केला खुलासा
sundar-pichai
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : जगप्रसिद्ध माहीती तंत्रज्ञान कंपनी गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे अमेरिकन – भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचा पगार नेमका किती आहे ? हा तमाम भारतीयांच्या औत्सुक्याचा विषय आहे. गुगल ( Google ) कंपनीची पॅरेंट कंपनी अल्फाबेट ( Alphabet Inc )  कंपनीने या संदर्भात नुकताच खुलासा केला आहे. तर आपण जाणून घेऊया गुगलने सुंदर पिचाई यांना नेमके कितीचे पॅकेज दिले आहे.

सुंदर पिचई यांचे पॅकेज अल्फाबेट कंपनीच्या इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे. गुगल कंपनीने सुंदर पिचाई यांना तब्बल 21.8 कोटी डॉलरचे पॅकेज ( 1788.5 कोटी रूपये ) देण्यात आले आहे. सीईओ सुंदर पिचई यांना आधी महिन्याला 63 लाख डॉलर दिले जात होते. परंतू त्यावेळी त्यांना स्टॉक अ‍ॅवार्ड ( शेअर ) देण्यात आले नव्हते. गेले तीन महिने त्यांचा पगार कायम तोच राहीला होता. त्यांना दर महिन्याला 20 लाख डॉलर देण्यात येत होते.

अल्फाबेटच्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार

गुगल कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेन्ट प्रभाकर राघवन यांना कंपनीने 3.7 कोटी डॉलरचे पॅकेज दिले आहे. तर चिफ फायनान्सियल ऑफीसरला 2.45 कोटी डॉलरचे पॅकेज देण्यात आले आहेत. पिचई यांना मिळालेले पॅकेज अल्फाबेटच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या तुलनेत जास्तच आहे. साल 2022 मध्ये कंपनीचे चिफ बिजनेस ऑफीसर फिलिप्स शिंडलर यांना 3.7 कोटी डॉलर देण्यात आले होते. SEC फायलिंगच्या मते कर्मचाऱ्यांना दरवर्षी कंपनीचे स्टॉक अ‍ॅवार्ड ( शेअर ) दिले जातात.

कंपनीने केली कर्मचाऱ्यांची कपात

गुगल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची अलिकडे घाऊक प्रमाणात कपात केली आहे. अलिकडे कंपनीने आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. अमेरिकन नागरिक असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई मूळ भारतीय वंशाचे आहेत. गुगुल या तगड्या टेक कंपनीच्या ‘गुगल सर्च’ सेक्शनच्या अल्फाबेट कंपनीचे 10 ऑगस्ट 2015 रोजी सीईओ झाले आहेत. तर 2 ऑगस्ट 2015 ‘गुगल सर्च’ ते नवे एक्झुकेटीव्ह म्हणून निवडले गेले. 10 जून 1972 साली जन्मलेले सुंदर पिचई सकाळच्या ब्रेकफास्टला खूप महत्वाचा मानतात. एकदा दिवसाची सुरूवात चांगल्या न्याहारीने झाली की दिवस चांगला जातो असे ते मानतात.