नवी दिल्ली– एटीएम मधून विना कार्ड पैसे (ATM CASH WIDRAW) काढण्याचा तुम्ही विचार केला होता का? एटीएम मधून विना कार्ड पैसे काढू शकता. त्यामुळे येत्या काळात पूर्णवेळ एटीएम कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. देशातील सर्व बँका व एटीएम ऑपरेटर्सना यांना विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने देशभरातील सर्व बँकांना एटीएम मध्ये विना कार्ड पैसे (CARDLESS TRANSACTION) काढण्याची व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. यूपीआय समकक्ष अॅपच्या माध्यमातून पैसे काढले जाऊ शकतात. सद्यस्थितीत देशातील मोजक्या एटीएम केंद्रावर सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पूर्ण क्षमतेनं अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या (RESEREV BANK OF INDIA) निर्देशानंतर विना कार्ड एटीएम मधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची दाट शक्यता आहे.
नव्या पद्धतीनुसार यूपीआय पिनचा उपयोग व्यवहाराच्या अधिकृततेसाठी करण्यात येईल. विशेष म्हणजे यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सेवा पूर्णपणे नि:शुल्क असेल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व्यवहारांच्या डिजिटल स्वरुपासाठी प्रयत्नशील आहे. विना कार्ड पैसे काढणे हा त्याच उपक्रमाचा महत्वाकांक्षी भाग मानला जातो.
निवडक बँकात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. सेवेच्या सार्वत्रिकरणासाठी एटीएम मध्ये मुलभूत स्वरुपाचे बदल हाती घ्यावे लागतील. एटीएम मध्ये यूपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा लागेल. नवी व्यवस्था प्रत्यक्षात आल्यास कार्डची ऐवश्यकता भासणार नाही. केवळ एटीएम वरील क्यूआर कोड स्कॅन करण्याद्वारे व्यवहार प्रत्यक्षात येईल.
· केवळ यूपीआय मार्फत होणारं ट्रान्झॅक्शनची कार्यपदधती अत्यंत सुलभ मानली जाते
· एटीएम मध्ये व्यवहारासाठी यापुढील काळात प्रत्यक्ष कार्ड सोबत बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही.
· विना कार्ड व्यवहार केल्यामुळे होणाऱ्या गैरव्यवहारांना थेट प्रतिबंध करता येईल. माहिती गुप्तपणे प्राप्त करुन गैरव्यवहाराचे प्रकार अलीकडच्या काळात समोर आले होते.