नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : उद्योगपती गौतम अदानी यांना सुप्रीम दिलासा मिळाला आहे. हिंडनबर्ग प्रकरण गेल्यावर्षीच्या सुरुवातीलाच अदानी समूहाच्या मानगुटीवर बसलेले आहे. ते काही उतरण्याचे नाव घेत नाही. पण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अदानी यांना मोठा दिलासा दिला. प्रकरणात बाजार नियंत्रक सेबी ही एक सक्षम यंत्रणा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. सेबीच्या तपासात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. उरलेल्या दोन केसबाबत तपास करण्यासाठी सेबीला सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यांचा वेळ दिला आहे. याप्रकरणी एसआयटी अथवा सीबीआयला तपास द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
निकालपत्रातील मुद्दे काय
काय आहे प्रकरण
गौतम अदानी आणि अदानी समूहाविरोधात जानेवारी 2023 मध्ये आरोपांची राळ उडाली होती. अमेरिकेची शॉर्टसेलर संस्था हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनियमिततेचे आरोप केले होते. अदानी समूहाने शेअरच्या किंमती फुगवल्याचा प्रमुख आरोप होता. त्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकार अदानी समूहाला वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आरोपांमुळे अदानी समूहाचे शेअर धडाधड कोसळले. कंपनीने अनेक शेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप हिंडनबर्गने केला होता. अदानी समूहाने हा आरोप फेटाळला.
कंपनीला 150 अब्ज डॉलरचा फटका
हा रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी विक्रीचे सत्र आरंभिले. कंपनीचे मार्केट कॅप झपाट्याने खाली आले. त्यावेळी कंपनीचे बाजारातील भांडवल 150 अब्ज डॉलरने घसरले. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. न्यायालयाने तपासासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित केली. गेल्या काही दिवसांत अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर चांगली कामगिरी बजावत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सूटकेचा निश्वास टाकला आहे.