इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचा 6 महिन्यांचा नातू एकाग्र मूर्ती याच्या नावे 240 कोटी रुपये मूल्याचे 15 लाख शेअर केले. एकाग्र देशातील सर्वात श्रीमंत मुलं ठरलं. इतर अनेक श्रीमंतांनी पण त्यांच्या मुलांच्या, नातवांच्या नावे काही ना काही संपत्ती करुन दिल्याने ते रात्रीतूनच श्रीमंत ठरले. आता या सिने कलाकाराने पण तोच कित्ता गिरवला. त्याने 250 कोटींचा बंगला आपल्या 1.4 वर्षांच्या मुलीच्या नावे केला. तीने एकाग्र मूर्तीचा रेकॉर्ड मोडला. ती सर्वात श्रीमंत पापा की परी ठरली आहे.
रणबीर-आलियाची मुलगी
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांची मुलगी राहा कपूर आहे. नीतू कपूरस हे कुटुंब बांद्रा येथील कृष्णा राज बंगल्यात राहते. बॉलिवूड लाईफच्या एका रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलियाने त्यांची मुलगी राहा हिच्या नावे हा 250 कोटींचा बंगला करुन दिला. त्यामुळे राहा ही बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत बाळ ठरली आहे. रणबीर-आलियाची मुलगी सध्या
1 वर्ष 4 महिन्यांची आहे. तिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता.
ही संपत्ती किती जुनी?
अभिनेता राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज या बंगल्याचे मालक होते. कपूर कुटुंबातील एकटा नातू असल्याने रणबीर कपूर याला ही संपत्ती वारसा हक्काने मिळाली आहे. त्यांनी आता हा बंगला आता मुलगी राहा हिच्या नावे केला आहे. मुलीला त्यांनी हा बंगला भेट म्हणून दिला आहे. भारतात वडिलोपार्जीत संपती कर परिघाबाहेर आहे.
वांद्रेत दुसरी सदनिका
या बंगल्याव्यतिरिक्त या स्टार कपलकडे वांद्रे(बांद्रा) परिसरात 4 फ्लॅट आहेत. त्यांची किंमत 60 कोटींपेक्षा अधिक आहे. एका रिपोर्टनुसार, या फ्लॅटचे काम पूर्ण झाल्यावर तो शाहरुख खान याच्या मन्नत तर अमिताभ बच्चन यांच्या जलसाच्या तुलनेत मुंबईतील सर्वात महागडा फ्लॅट, बंगला ठरेल.
नीता अंबानी यांनी दिला 451 कोटींचा हार
श्लोका मेहता हिला नीता अंबानी यांनी महागडे गिफ्ट दिले आहे. मुलगा आकाश याची श्लोका ही पत्नी आहे. तीला नीता अंबानी यांनी मौल्यवान हार गिफ्ट केला. या हारची किंमत जवळपास 451 कोटी रुपये होती. या हारमध्ये 407.48 कॅरेट येलो डायमंड आणि 18 कॅरेटचे गोल्ड रोझ आणि 229.52 कॅरेट पांढऱ्या हिऱ्यांचा सेट आहे.