फूड आणि ग्रॉसरी डिलिव्हरी करणारी ऑनलाईन कंपनी स्विगीने एक नवीन एप लाँच केले आहे. या एपचे नाव SNACC असे आहे. हे नवीन एप ताजे जेवण आणि पेय आणि क्विक बाईट्स सारखे स्नॅक्स केवळ १५ मिनिटात तुमच्या घरी पोहचवणार आहे. स्विगीसाठी हे एप नवीन दिशा घेऊन आली आहे.कारण आतापर्यंत स्विगीच्या सर्व सेवा एकाच एप अंतर्गत दिल्या जात होत्या. त्यात फूड डिलिव्हरी, क्विक कॉमर्ससाठी स्विग इंस्टामार्ट, हायपर लोकल डिलिव्हरी किंवा डायनिंग आऊटचे सर्व ऑप्शन एकाच एप अंतर्गत येत होत्या…
SNACC एप पाहिल्यावर समजते की 7 जानेवारीपासून हे एप लाईव्ह झाले. या एपचा रंग ब्राईट फ्लोरिसेंट हिरव्या रंगाच्या बॅकग्राऊंडसह येत आहे. ज्यावर डार्क ब्ल्यू रंगाची अक्षरं दिसत आहेत.
स्विगीने आपले होम बेस म्हणजे बंगळुरु येथून या नवीन एपच्या सेवेची सुरुवात केली आहे. लवकरच देशात इतरत्र देखील हे एप सुरु होणार आहे. स्विगीच्या स्वत:च्या SNACC एपला अन्य रिजनमध्येही लवकरच सुरु करण्याची योजना असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
ब्लिंकिटचे बिस्ट्रो, झेप्टोचे कॅफे एण्ड स्विश सारख्या सर्व मोठ्या कंपन्या आप -आपल्या एपचे दोन भागात विभागणी किंवा दुप्पट करीत आहे. यात खास करुन क्विक कॉमर्सच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाला वेगळे केले जात आहे. कंपन्या रॅपिड फूड डिलिव्हरीच्या बाजारात लवकरात लवकर उतरु इच्छीत आहे. ज्यामुळे या क्षेत्रात वाढत्या युजर्स आपल्याकडे खेचण्याची कंपनीची योजना आहे.
क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म सारख्या ब्लिंकिटची मालकी झोमॅटो जवळ आहे. झेप्टो आपल्या फूड डिलिव्हरी व्यवसायासाठी वेग-वेगळे एप लाँच करीत आहे. याद्वारे आपली ग्राहक संख्या वाढविण्याबरोबरच यांचे लक्ष्य क्विक कॉमर्सपासून फूड डिलिव्हरी बिझनेसला वेगळे करुन ऑपरेट करुन जास्तीत जास्त व्यवसाय वाढविण्याची कंपन्यांची योजना आहे.