नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : परंपरागत हाडवैरी भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगला. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशातील खेळाडू मैदानावर समजंसपणा दाखवत आहेत. बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील मैत्रीने या सामन्यातील वैर संपवून खेळाडूवृत्ती वाढली आहे. हे एक चांगले पाऊल आहे. शनिवारच्या रोमांचक मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला (India-Pakistan World Cup match) नमवले. पण फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने या मॅच दरम्यान भारतीयांचा मूड काय होता हे अत्यंत मिश्किलपणे एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) मांडले आहे. त्यामुळे देशभरात एकच खसखस पिकली आहे. फॅन्सनी यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
येथे रंगला सामना
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगला. हा सामना बघण्यासाठी एक लाखांहून जास्त प्रेक्षक आले होते. तर ऑफिस, दुकानं, घरी बसून अनेकांना या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. पाकिस्तानच्या विकेट पडत असताना अनेक ठिकाणी फटक्यांची आतषबाजी सुरु होती. भारत जिंकल्यानंतर देशात जणू दिवाळीच सुरु झाली. अनेक शहरात फटका फोडण्यात आले. पण खरी गंमत आणली ती फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने (Swiggy). ट्विटर हँडलवरुन त्यांनी या सामन्या दरम्यान किती बिर्याणी फस्त झाल्या आणि किती कंडोमची विक्री झाली याची माहिती दिली. त्यावर मिश्किल कमेंटचा पाऊस पडला आहे.
ड्यूरेक्स इंडियाची पण कमेंट
स्विगीने या सामन्या दरम्यान देशभरात त्यांना कंडोमची ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली. या सामन्या दरम्यान त्यांना ग्राहकांकडून 3509 कंडोमची ऑर्डर देण्यात आली. स्विगीच्या या ट्विटवर युझर्सनी मिश्किल कमेंटचा पाऊस पाडला. ‘कमीत कमी ते खेळले तरी, त्यांनी पाकिस्तान सारखी माघार घेतली नाही’ अशी कमेंट एका युझरने टाकली आहे. स्विगीच्या या पोस्टवर कंडोम उत्पादक कंपनी ड्युरेक्स इंडियाने पण कमेंट दिली आहे. ‘आम्ही आशा करतो की या 3509 खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली असेल.’ अशी प्रतिक्रिया ड्युरेक्सने दिली आहे.
3509 condoms ordered, some players are playing off the pitch today 👀 #INDvsPAK@DisneyPlusHS @SwiggyInstamart pic.twitter.com/oOiVTNsQeL
— Swiggy (@Swiggy) October 14, 2023
प्रति मिनिट 250 बिर्याणींची ऑर्डर
केवळ कंडोमच नाही तर या सामन्या दरम्यान क्रिकेट प्रेमींनी बिर्याणीवर पण ताव मारला. शनिवारी पाकिस्तान-भारत यांच्या दरम्यानच्या सामन्यात प्रेक्षकांनी बिर्याणीचा फडशा पाडला. एका मिनिटाला या फूड डिलिव्हरी कंपनीला 250 बिर्याणींची ऑर्डर मिळाली. त्यामुळे या काळात स्विगीचे डिलिव्हरी बॉय एकदम व्यस्त होते. त्यांना झटपट या बिर्याणी त्या त्या भागात पोहचवल्या.
एका कुटुंबाची 70 बिर्याणींची ऑर्डर
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी अनेक जणांनी बु्ट्टी मारली. काहींना हा सामना त्यांच्या कुटुंबियांसोबत एन्जॉय केला. अवघं कुटुंबाचं या काळात टीव्हीसमोर बसून होते. चंदीगड येथील एका कुटुंबाने तर एकाचवेळी स्विगीकडे 70 बिर्याणींची ऑर्डर बुक केली. त्यामुळे फॅमिली गेट टुगेदर करत काहींनी सामन्याचा आनंद घेतल्याचे दिसून येते. काही युझर्सने स्विगीकडे डिस्काऊंट कोडची पण मागणी केली.