शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्वाची ठरणार आहे. आजापासून स्टॉक मार्केटमध्ये शेअरची खरेदी-विक्रीसाठी नवीन पद्धत लागू होत आहे. शेअर बाजारात T+0 सेटलमेंट व्यवस्था आजपासून लागू होत आहे. म्हणजे एकडे शेअर बाजारात सौदा पूर्ण झाला की, लागलीच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. शेअर विक्री केल्यावर पैशांसाठी आता एका दिवसाची पण वाट पाहण्याची गरज नाही. मुंबई स्टॉक एक्सचेंजने (BSE) ज्यांच्यासाठी 28 मार्च 2024 पासून हा नियम लागू होणार आहे, अशा कंपन्यांची यादी पण जाहीर केली आहे. T+0 ही व्यवस्था लागू झाल्यामुळे भारत हा चीननंतर अशी व्यवस्था देणारा जगातील दुसरा देश ठरला आहे.
जगात चीननंतर भारत
सध्या भारतीय शेअर बाजारात T+1 व्यवस्था लागू आहे. म्हणजे ट्रेंडिगनंतर एका दिवसात शेअर विक्रीची रक्कम खात्यात जमा होते. जगातील अनेक देशात सध्या T+2 अशी व्यवस्था आहे. T+0 ही व्यवस्था आजपासून लागू होत आहे. अशी व्यवस्था लागू करणारा भारत हा चीननंतरचा जगातील दुसरा देश ठरला आहे. आज 28 मार्चपासून कॅश सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या खात्यात झटपट पैसा जमा होईल. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांनी यापूर्वीच ही माहिती दिली होती. आता शेअरच्या खरेदी-विक्रीचा झटपट व्यवहार होईल.
नियम दोन टप्प्यात लागू