ही भारतीय कंपनी प्रथमच आयफोन बनविणार, भारतच नाही तर जगभर होणार निर्यात

| Updated on: Oct 27, 2023 | 8:53 PM

भारतातील अत्यंत विश्वासार्ह नाव असलेला एका लोकप्रिय उद्योग समुहाला भारतात आयफोनची निर्मिती करण्याचा पहिला मान मिळणार आहे. हे आयफोन केवळ भारतीय ग्राहकांसाठी नव्हे तर जगभराती मार्केटसाठी उपलब्ध असणार आहेत.

ही भारतीय कंपनी प्रथमच आयफोन बनविणार, भारतच नाही तर जगभर होणार निर्यात
iphone 15
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : भारतातील उद्योग विश्वातील अत्यंत विश्वासाचं आदराचं स्थान असलेला टाटा उद्योग समुह भारतातील पहिल्या आयफोनची ( Apple iPhone ) निर्मिती करणारी कंपनी ठरणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर राजीव चंद्रशेखर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की टाटा ग्रुपच भारतात आयफोनची निर्मिती सरु करणार आहे. हे आयफोन डीव्हाईस केवळ भारतातच नाही तर जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहचणार आहेत.

भारतात एप्पल कंपनीचा आयफोन ( Apple iPhone ) बनविण्याचे काम लवकरच टाटा ग्रुपला मिळणार आहे. भारतात आयफोन बनविणारी कंपनी विस्ट्रॉन ( Wistron ) इंफोकॉम मॅन्युफॅक्चरींग इंफोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडीयाचे अधिग्रहन टाटा ग्रुप करीत आहे. या अधिग्रहनाला विस्ट्रॉन इंफोकॉमची पॅरंट कंपनी विस्टॉन कॉर्पच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सोशल मिडीयावर याबद्दल माहीती दिली आहे. त्यांनी म्हटले की टाटा ग्रुप अडीच वर्षांच्या आत घरगुती आणि जागतिक मार्केटसाठी भारतातच आयफोन तयार करण्यास सुरुवात करणार आहे.

सध्या विस्ट्रॉनचा भारतीय प्लांट आपल्या 8 प्रोडक्शन लाईनमध्ये आयफोन-12 आणि आयफोन-14 ची मॅन्युफॅक्चरिंग करीत आहेत. टाटाच्या अधिग्रहनानंतर विस्ट्रॉन संपूर्णपणे भारतीय बाजारातून बाहेर पडेल. कारण भारतात एप्पल प्रोडक्ट्सचे प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीचा हा एकमात्र प्लांट आहे.

येथे पाहा ट्वीट –

आयटी मंत्र्यांचा टाटाला शुभेच्छा

माहीती तंत्रज्ञान मंत्र्यांनी आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्ट एक्स ( आधीचे ट्वीटर ) वर एक पोस्ट टाकून ही माहीती दिली आहे. त्यांनी MeitY ला टॅग करून पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी पीएलआय योजनेने आधीच भारताला स्मार्टफोनची निर्मिती आणि निर्यातीसाठी एक विश्वसनीय आणि प्रमुख केंद्र तयार करण्यासाठी प्रेरित केले आहे. अडीच वर्षात टाटा घरगुती आणि जागतिक बाजारासाठी भारत आयफोन तयार करण्यास सुरुवात केली आहे. विस्ट्रॉनचे संचलन सांभाळण्यासाठी टाटा टीमला शुभेच्छा’

एक वर्षे सुरु आहे चर्चा

विस्ट्रॉन फॅक्ट्री कर्नाटकच्या साऊथ ईस्टमध्ये आहे. एका अहवालानूसार मार्च 2024 पर्यंत विस्ट्रॉन या फॅक्ट्रीतून सुमारे 1.8 अब्ज डॉलरचे एप्पलचे आयफोन तयार करणार आहे. टाटा या कंपनीत जागतिक मार्केटसाठी iPhone 15 ची निर्मिती करणार आहे. विस्ट्रॉन फॅक्टरीची वॅल्युएशन सुमारे 600 अब्ज डॉलर आहे. या करारावर एक वर्षांपासून चर्चा सुरु होती.