मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. भारतातील प्रमुख उद्योगसमूह टाटा ग्रुपनं कोरोना लढ्यासाठी 1500 कोटी रुपयांची मदत केलेली आहे.टाटा ग्रुपच्या कंपन्यांमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे टाटा ग्रुपनं क्रायोजेनिक टँकरची आयात देखील केली आहे. टाटा ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या टाटा ग्रुपला लसीकरण हाच कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याचा मार्ग आहे, असं वाटत आहे. (Tata group said Faster vaccination will save people and economy from covid)
टाटा ग्रुपनं परदेशातून 60 क्रायोजेनिक टँकर आयात करण्याचा निर्णय घेतल्याची त्यासोबत 400 ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यानं दिली. याद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन छोट्या रुग्णालयांमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय टाटा ग्रुप कोल्ड स्टोरेजची चैन तायर करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोरोना प्रतिबंधक लसींना विशिष्ट तापमानात ठेवता येईल.
टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल यांनी जितक्या वेगानं कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावं असं म्हटलं आहे. जितकं वेगवान लसीकरण होईल तेवढ्या लोकांना सुरक्षित करता येईल. हा सुरक्षित मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारत सरकारनं जग भरातील कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी दिली पाहिजे, असंही बनमाली अग्रवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना लसींसाठी कोल्ड चेनची गरज असते. या दृष्टीनं आम्ही तयारी करत आहोत. सुदैवानं आमच्या ग्रुपकडे वोल्टास सारखी कंपनी आहे, असंही बनवाली अग्रवाल म्हणाले.
बनमाली अग्रवाल यांनी आपल्याला आरोग्य संबधी पायाभूत सुविंधासाठी दिर्घकालीन विचार करुन गुंतवणूक करण्याची गरज आहे, असं स्पष्ट केले. ही आपल्या देशासाठी महत्वाची बाब आहे. आपल्या कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याच्या क्षमतेवर भारताच्या आर्थिक विकासाची प्रगती अवलंबून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्यासमोर अन्य आव्हान आहेत पण कोरोनाला प्रतिबंद करु शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा https://t.co/wPYLdwmC3h #coronavirus #COVID19India #Lancet
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
इतर बातम्या:
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले
मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय
Tata group said Faster vaccination will save people and economy from covid