नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण आर्थिक जगताचे लक्ष लागून राहिलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एअर इंडिया आता पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विक्रीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी समितीने टाटा समूहाच्या निविदेला मंजूरी दिली आहे. आज सकाळपासून तशी चर्चाही सुरु होती. मात्र, काहीवेळापूर्वीच निर्गुंतवणूक मंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल, असे निर्गुंतवणूक मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले
Media reports indicating approval of financial bids by Government of India in the AI disinvestment case are incorrect. Media will be informed of the Government decision as and when it is taken: Secretary, Department of Investment and Public Asset Management, GoI pic.twitter.com/PoWk7UceF5
— ANI (@ANI) October 1, 2021
जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनी स्थापन केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. मात्र, आज 68 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत होते. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. एअर इंडियासाठी विक्रीसाठी लावण्यात आलेल्या आर्थिक बोलीत 85 टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर 15 टक्के हा रोख रूपात सरकारी तिजोरीत येण्याचे अंदाजण्यात येत आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात गेल्यास आता मरगळ आलेल्या भारतीय हवाई सेवा क्षेत्रात चैतन्य संचारण्याची शक्यता आहे.
BREAKING :
– After 68 years of being taken away, Tatas win Air India, per @business
– Announcement soon (shraadh, so after 6th Oct?)
– SpiceJet’s Ajay Singh being the losing bidder. pic.twitter.com/aSOAlfD3if
— Tarun Shukla (@shukla_tarun) October 1, 2021
निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती ती कोविड 19 महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर 2020 मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.
2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.
संबंधित बातम्या:
67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार?, अधिग्रहणासाठी लावली बोली
कर्मचाऱ्यांकडूनच ‘एअर इंडिया’ विकत घेण्याची तयारी; एक-एक लाख रुपयांची वर्गणी