Tata Motors चे होणार दोन भाग; ग्राहकांना काय फायदा होणार, जाणून घ्या

| Updated on: Mar 05, 2024 | 12:05 PM

Tata Motors Demerger | सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या टाटा समूहातील ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ची विभागणी होत आहे. ही कंपनी दोन भागात विभाजीत होईल. एक कंपनी केवळ व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करेल तर दुसरी कंपनी पॅसेंजर वाहनांची निर्मिती करणार आहे. या बदलाचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

Tata Motors चे होणार दोन भाग; ग्राहकांना काय फायदा होणार, जाणून घ्या
Follow us on

नवी दिल्ली | 5 March 2024 : कार विक्रीत हुंदाईला धोबीपछाड देणाऱ्या Tata Motors मध्ये वाटेहिस्से होणार आहे. लवकरच टाटा मोटर्स देशातील सर्वात मोठी कंपनी Maruti Suzuki India ला पण टाटा मोटर्स पिछाडीवर टाकण्याची शक्यता आहे. त्यासाठी टाटा मोटर्सने अनेक योजना आखल्या आहेत. त्यातील सर्वात मोठा बदल हा कंपनीतील वाटणीचा आहे. टाटा मोटर्स पोर्टफोलियोत बदल करत आहे. सुरक्षित आणि मजबूत कारवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी टाटा मोटर्स विभाजीत होत आहे. व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी एक सेगमेंट असेल. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

दोन सेगमेंटमध्ये विभागणी

टाटा मोटर्सच्या बोर्डाने केलेल्या घोषणेनुसार, आता व्यवसायाचे दोन भाग होतील. यामध्ये एक भाग व्यावसायिक वाहनांसाठी असेल. त्यात बस, ट्रक, छोटा हाथी यांच्यासह इतर वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. तर दुसरे सेगमेंट पॅसेंजर व्हेईकलवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. यामध्ये पेट्रोल-डिझेल कार, इलेक्ट्रिक कार आणि कंपनीचे भविष्यातील प्रकल्पाचा समावेश आहे. त्याचा शेअरधारकांना फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

कोणत्या व्यवसायाचा अधिक फायदा?

  1. टाटा मोटर्समधील वाटणीचा कोणत्या सेगमेंटला, कंपनीला फायदा होईल, असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे. आताच त्याविषयी काही भाष्य करणे हे घाईघाईचे ठरेल. कदाचित पॅसेंजर वाहने आणि व्यावसायिक वाहनं यापैकी कोणते सेगमेंट आगेकूच करेल हे लवकरच समोर येईल.
  2. कंपनी व्यावसायिक वाहनामध्ये पूर्वीपासूनच होती. आता कंपनीने पॅसेंजर वाहनांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कर्मशियल व्हेईकलमध्ये टाटा मोटर्स देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. तर पॅसेंजर व्हेईकलमध्ये इलेक्ट्रिक कारमध्ये टाटाने आघाडी घेतली आहे. जगुआर लँडरोव्हरसारखे ब्रँड पण या कंपनीच्या खिशात आहे.
  3. इलेक्ट्रिक कार आणि भविष्यातील इतर प्रकल्पावर कंपनीला लक्ष केंद्रीत करायचे आहे. जर रणनीती यशस्वी ठरली तर कंपनी शेअर बाजारात मोठी झेप घेईल. त्यामुळे टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरुर घ्या.