Tata करणार जगावर राज्य! 9,94,930 कोटींची गुंतवणूक करणार

| Updated on: Mar 01, 2024 | 10:09 AM

Tata Group | भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह Tata Group आता लवकरच जगावर राज्य करेल. कंपनीने त्यासाठी 120 अब्ज डॉलरच्या, 9,94,930 कोटींच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. टाटा हा विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. कशासाठी आहे ही योजना, कार यामुळे स्वस्त होईल का? घ्या जाणून...

Tata करणार जगावर राज्य! 9,94,930 कोटींची गुंतवणूक करणार
Follow us on

नवी दिल्ली | 1 March 2024 : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या कार्यकाळातच टाटा समूह जगावर राज्य करणार आहे. टाटा समूहाने अनेक व्हेंचर्समध्ये गुंतवणूक सुरु केली आहे. भारत सरकारने टाटाला मोठा दिलासा दिला आहे. टाटा समूहाच्या दोन सेमीकंडक्टर प्लँटला मंजूरी दिली आहे. येत्या 100 दिवसांत त्यासाठी काम पण करण्यात येणार आहे. टाटा समूहाने भविष्यात पण महत्व टिकवून ठेवण्यासाठी 120 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 9,94,930 कोटींच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. काय आहे ही योजना, या योजनेमुळे तुमची कार स्वस्त होण्यास मदत मिळेल का? जाणून घ्या..

रतन टाटा यांनी टाटा समूहाला शिखरावर पोहचवले आहे. त्यांच्या काळात भविष्यातील नवनवीन तंत्रज्ञानासाठी गुंतवणुकीच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यासाठी गुंतवणूक सुरु करण्यात आली आहे. आता या समूहाने स्टील, ऑटोमोबाईल्स आणि पॉवर या पारंपारिक उद्योगासह इतर उद्योगांवर पण लक्ष केंद्रीत केले आहे. एन. चंद्रशेखरन यांनी या समूहाची कमान सांभाळल्यापासून तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमूख बाजारावर लक्ष वाढविण्यात आले आहे.

टाटाने या व्यवसायावर वाढवले लक्ष

हे सुद्धा वाचा
  • टाटा समूहने डिजिटल क्षेत्रावर भर दिला आहे. टाटा 1एमजीपासून ते बिग बास्केट, टाटा न्यू, टाट क्लिक अशा अनेक व्हेंचर्सचा श्रीगणेशा सुरु आहे. तर टाटा ग्राहक बाजारावर पण लक्ष वाढले आहे. यामध्ये नवीन खाद्यपदार्थ, रेडी 2 कुक, रेडी 2 ईट आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांची नवीन रेंज वाढविण्यात आली आहे.
  • टाटा समूहाने फॅशन, मॉर्डन रिटेल, एसेसरीज, आयवियर वर पण फोकस वाढवला आहे. तर इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये आज टाटा समूह देशातील सर्वात मोठा समूह आहे. या आधारे कंपनी जगावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.

टाटाचा 120 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्लॅन

टाटा समूहाने 2027 पर्यंत एकूण 90 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. भारतात ही कोणत्याही मोठ्या व्यावसायिक समूहाची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक योजना आहे. आता ही गुंतवणूक वाढवून 120 अब्ज डॉलर, 9,94,930 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. टाटा मुख्यत्वे सेमीकंडक्टर्स, संरक्षण, इलेक्ट्रिक व्हेईकल्स, बॅटरी आणि एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे कार स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेमीकंडक्टरच्या मध्यंतरीच्या तुटवड्याने त्याचे महत्व अधोरेखीत केले आहे. सेमीकंडक्टर भारतात तयार झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन फायदा होऊ शकतो.

सेमीकंडक्टर प्लँट

टाटा समूह जवळपास 27,000 कोटी रुपये गुंतवणूक करुन आसाममध्ये तर गुजरातमध्ये 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सेमीकंडक्टर प्लँटसाठी करत आहे. तर एअर इंडियासाठी 470 नवीन विमान खरेदीसाठी जवळपास 5,80,375 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय गुजरातमध्ये, युरोपमध्ये बॅटरी प्रकल्प, युरोपमध्ये डिजिटल आणि संरक्षण क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची योजना आहे.