Tata IPO : पैसा आताच ठेवा गाठीशी! टाटा करणार बाजारात मोठा उलटफेर

| Updated on: Sep 16, 2023 | 6:10 PM

Tata IPO : गेल्या काही वर्षात LIC आणि Paytm च्या आयपीओची बाजारात चर्चा होती. आता टाटा समूहाच्या या IPO ची जोरदार चर्चा होत आहे, येणार तरी कधी हा आयपीओ?

Tata IPO : पैसा आताच ठेवा गाठीशी! टाटा करणार बाजारात मोठा उलटफेर
Follow us on

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : देशातील सर्वात मोठ्या उद्योग घराण्यापैकी टाटा समूह हा एक आहे. टाटा समूहातील आयपीओ जवळपास 19 वर्षांनी बाजारात येणार आहे. या आयपीओचा सर्वच जण प्रतिक्षा करत आहे. टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies IPO) आयपीओची चर्चा आता मागे पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बाजार नियामक सेबीने (SEBI) आयपीओसाठी एक महिन्यापूर्वीच मंजूरी दिली आहे. टाटा समूह लवकरच 55,000 कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन येत आहे. यापूर्वी एलआयसीचा आयपीओ 21,000 कोटी रुपयांचा तर पेटीएमचा आयपीओ 18,300 कोटी रुपयांचा होता. त्यापेक्षा टाटाचा आयपीओ अनेक पटीने मोठा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे टाटा समूहा हा आयपीओ बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ (TCS IPO) जुलै, 2004 मध्ये आला होता. त्यामुळे या दोन आयपीओसाठी पैसे तयार ठेवा.

ही अपडेट महत्वाची

2018 मध्ये आयएलअँडएफएस (IL&FS) सारख्या मोठ्या गुंतवणूक कंपन्या अपयशी ठरल्याने आरबीआयने 2021 मध्ये नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यासाठी नियम कडक करण्यात आले. टाटा समूहातील होल्डिंग कंपनी टाटा सन्स ही अपर लेअर एनबीएफसी आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत ही कंपनी सूचीबद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. ती वाढविण्यात आली.

हे सुद्धा वाचा

सप्टेंबर 2025 पर्यंत सूचीबद्ध होण्यासाठी सवलत

आरबीआयने टाटा सन्सला अपर लेअर एनबीएफसीसाठी वर्गीकृत करण्यात आली आहे. या कंपनीला शेअर बाजारात सप्टेंबर 2025 पर्यंत सूचीबद्ध व्हावे लागेल. त्यानंतर इतर कंपन्यांचे शेअर पण या धावपळीत सहभागी होतील. टाटा सन्सचे बाजारातील मूल्य जवळपास 11 लाख कोटी रुपये आहे. जर कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली तर हा आयपीओ 55,000 कोटी रुपयांचा होण्याची शक्यता आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.

इतर NBFC कंपन्या कोणत्या

टाटा सन्स यांच्या ऐवजी आरबीआयने अपर लेअर एनबीएफसी यादीत एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, श्रीराम फायनान्स लिमिटेड, एलअँडटी फायनान्स लिमिटेड, पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनेन्शिअल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल फायनान्स सर्व्हिसेस, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, एचडीबी फायनेन्शिअल सर्व्हिसेज, आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड, मुथूट फायनान्स लिमिटेड आणि बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपन्यांचा समावेश होता.

टाटा मोटर्स होणार कर्जमुक्त 

टाटा मोटर्स जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केलेला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते.