मुंबई : ईपीएफओ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीमध्ये (Provident Fund ) अडीच लाखांपेक्षा जास्त रुपये जमा केल्यास आता व्याज आकारले जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Tax on Employees Provident Fund interest)
मिळालेल्या माहितीनुसार, पीएफ अकाऊंटमध्ये वर्षभरात अडीच लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना आता कमी परतावा मिळणार आहे. म्हणजे तुमचा पीएफ जेवढा जास्त असेल, तेवढा कमी परतावा तुम्हाला मिळेल. याचे मुख्य कारण म्हणजे सरकार पीएफद्वारे मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेवर कर लागू करण्याच्या विचारात आहे. याचा थेट परिणाम नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडणार आहे.
देशातील एकूण 4.5 कोटी पीएफधारकांपैकी 1.23 लाख पीएफ खाती अशी आहेत, ज्यांची शिल्लक कोटींमध्ये आहे. देशातील पहिल्या 20 पीएफ खात्यांत 825 कोटी जमा आहेत. ज्यांची करोडोंची थकबाकी आहे, त्यांनाही कोट्यवधींचा व्याज मुक्त कर मिळत आहे.
?योगदान – परतावा?
?पीएफ स्लॅब?
?36 ते 48 लाख
ज्यांची वर्षाची कमाई 1 कोटी रुपये इतकी आहे. त्यावरील व्याजावर 30 टक्के टॅक्स लागू शकतो. त्यासोबतच 10 टक्के सरचार्जही लागू होणार आहे.
?60 लाखांपर्यंत
या व्यक्तींचा पगार हा 1 ते 2 कोटी इतका होतो, त्यांना 30 टक्के व्याज लागू होईल. तर 15 टक्के सरचार्ज लागू होईल.
?1.20 कोटी
30 टक्के कर आणि 25 टक्के सरचार्ज
?2.5 कोटी
30 टक्के कर आणि 37 टक्के सरचार्ज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी (01 फेब्रुवारी) वित्तीय वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये त्यांनी उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली. कोरोना महामारीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून सरकारने उद्योगधंदे आणि खासगी संस्थांना अनेक गोष्टींमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पीएफ उशिराने जमा केल्यास कुठलाही दंड आकारला जाणार नाही. म्हणजेच उशिराने पीएफ भरला तर कंपनी मालकाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी कंपन्या तसेच उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला. (Tax on Employees Provident Fund interest)
संबंधित बातम्या
Budget 2021-22 | केंद्र सरकारचा कंपन्यांना दिलासा, उशिराने पीएफ जमा केल्यावर दंड नाही
नोकरी बदलल्यास घरबसल्या दुसऱ्या खात्यात वळते करता येणार PF चे पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया